सख्खी मैत्रीण, पक्की वैरीण


सख्खी मैत्रीण, पक्की वैरीण
SHARES

मैत्रिणीनेच व्यावसायिक मित्राचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना सांताक्रूज परिसरात घडली आहे. या व्यावसायिकाचा मृतदेह एक्सयुव्ही  गाडीत आढळून आला असून, त्याचे नाव टिळकराज राजपूत ऊर्फ राजू असे आहे. या प्रकरणी सांताक्रुज पोलिसांनी राजूची मैत्रिण पियुरिटी पास्कल कुटिनो ऊर्फ रोनिताला अटक केली आहे. या हत्येत पियुरिटीसोबत आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान पियुरिटीला कोर्टात हजर केले असता तिला तीन तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

रविवारी पेट्रोलिंग दरम्यान एलआईसी कोलनी एस. व्ही. रोड वर पोलिसांना पार्क केलेली गाडी आढळली होती, या गाडीत एक इसम बेशुद्ध अवस्थेत आढळला, पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.   गाडीतील कागदपत्रांवरून या इसमाचे नाव टिळकराज राजपूत असल्याचे समजले. तपासादरम्यान पोलिसांनी  संशयावरून  पियुरिटीला ताब्यात घेतले,  चौकशीदरम्यान पियुरिटीने आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राजू आणि पियुरिटी चे गेल्या पाच ते सहा वर्षांपासूनचे संबंध होते. रविवारी फोन वर दोघांचे भांडण झाले.  त्यानंतर प्रत्यक्ष भेटीत देखील दोघांमध्ये वाद झाला आणि त्याच दरम्यान राजूची हत्या झाली. 

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा