भाऊ दाजी लाड लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी तिघांना अटक

भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयातील लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी भायखळा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

भाऊ दाजी लाड लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी तिघांना अटक
SHARES

भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयातील लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी भायखळा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. एक्स्पर्ट एक्विपमेंट प्रायव्हेट कंपनीचे संचालक रवींद्र मेनन, व्यवस्थापक विवेक मेनन आणि संग्रहालयातील कर्मचारी सुरेश घाडगे यांचा यांत समावेश आहे. या तिघांविरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलं आहे. 

काय आहे प्रकरण?

डॉ. अरनवाज हवेवाला (६३) या महिला दंतवैद्यक आणि त्यांची मुलगी हेरा (२८) या दोघी २८ एप्रिल राेजी वस्तुसंग्रहालय बघण्यासाठी गेल्या होत्या. तळमजल्यावरील संग्रहालय पाहून झाल्यानंतर त्या लिफ्टने पहिल्या मजल्यावरील संग्रहालयात गेल्या. तिथून लिफ्टने खाली उतरताना अचानक लिफ्ट कोसळली. 

या दुर्घटनेत डॉ. हवेवाला व त्यांची मुलगी जखमी झाल्यावर. वस्तुसंग्रहालय व्यवस्थापनाने त्यांना तातडीने भायखळ्यातील मसिना रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान डॉ. हवेवाला यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची राज्य सरकारच्या वतीने निरीक्षकामार्फत चौकशी करण्यात आली. त्यांच्या चौकशीत वस्तुसंग्रहालय आणि लिफ्टच्या देखभालीचं कामकाज पाहणाऱ्या एक्स्पर्ट एक्विपमेंट प्रायव्हेट या कंपनीवर ठपका ठेवण्यात आला. या अहवालाच्या आधारे भायखळा पोलिसांनी निष्काळजीमुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी ही कारवाई केली.हेही वाचा-

भोंदू महिलेने व्यावसायिकाला १२ लाखांना गंडवलं

सेक्स रॅकेट प्रकरणात ५ महिलांना अटकसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा