भोंदू महिलेने व्यावसायिकाला १२ लाखांना गंडवलं

गुरु मांँ ही स्वतःला अध्यात्मिक गुरू असल्याचं सांगून नागरिकांचे सर्व दुखः दूर करत असल्याचा दावा करते. एवढेच नाही. तर तिच्याकडे दैवी शक्ती असल्याचाही तिने दावा केला आहे. त्यानुसार या कुटुंबियानी गुरु माँ ची भेट घेतली.

भोंदू महिलेने व्यावसायिकाला १२ लाखांना गंडवलं
SHARES

साईबाबा माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी मला दैवीशक्ती दिली असून त्या शक्तीद्वारे मी तुझी भरभराट करीन, अशा भूलथापांद्वारे नाजोशी मार्ग येथे भोंदू महिलेने व्यावसायिकाला १२ लाखांना गंडवलं. किरण दारुवाला (३५) असं अटक केलेल्या गुरु माँ चं नाव आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


आमिष दाखवलं

मुंबईच्या ना. . जोशी मार्ग पोलिस ठाणे परिसरात राहणारे पिडीत कुटुंब गेली अनेक वर्षापासून कोटुंबिक आणि आर्थिक अडचणींमुळे नैराश्येत होते. अशातच व्यावसायिकाच्या एका मैत्रीणीने २०१६ साली लोअर परिसरात राहणाऱ्या गुरू माँ कडे जाण्याचं सुचविलं. गुरु मांँ ही स्वतःला अध्यात्मिक गुरू असल्याचं सांगून नागरिकांचे सर्व दुखः दूर करत असल्याचा दावा करते. एवढेच नाही. तर तिच्याकडे दैवी शक्ती असल्याचाही तिने दावा केला आहे. त्यानुसार या कुटुंबियानी गुरु माँ ची भेट घेतली. यावेळी तिने या कुटुंबियाना मला साईबाबाची सिद्धी प्राप्त झाली असल्याचे सागंत तुम्हाला नोकरी तसेच पैशांच्या राशीत खेळवेल असं आमिष दाखवलं.


आणखी पैशांची मागणी 

गुरु माँ ने सिद्धी करण्याचे सांगून वेळोवेळी या कुटुंबियाकडे २०१६ ते २०१९ या कालावधीत १२ लाख ७५ हजार ९०० रुपये घेतले. तसंच पुर्वाश्रमीचे पाप भरपुर असल्याचे सांगत या गुरु माँ ने या कुटुंबियाकडे आणखी पैशांची मागणी केली. मात्र, या कुटुंबियाला संशय आल्याने, त्यांनी एनएम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.



हेही वाचा -

सेक्स रॅकेट प्रकरणात ५ महिलांना अटक

हसिना पारकरचा मुलगा पोलिसांच्या रडारवर




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा