सेक्स रॅकेट प्रकरणात ५ महिलांना अटक

त्या जाहिरातीद्वारे तो फोनवर ग्राहकांना मुलीचे फोटो पाठवून मागणीनुसार मुली हाॅटेलवर बुक केलेल्या खोलीवर पाठवायचा. त्या महिलांना ग्राहक थांबलेल्या हाँटेलवर पाठवण्यासाठी या पाच महिला अपाॅईन्ट करायच्या,

सेक्स रॅकेट प्रकरणात ५ महिलांना अटक
SHARES

मुंबईत हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पर्दाफाश केला होता. या प्रकरणात पोलिसांनी रजनीश सिंग या एजंटला अटक केली होती. पुढील चौकशीत पोलिसांनी आता पाच महिलांना अटक केली आहे. या पाचही महिला ग्राहकांना मुलींकडे पाठवण्याचे काम करत होत्या.


वृत्तपत्रात जाहिरात

मुंबईतील नामांकित हाॅटेलमध्ये ग्राहकाच्या मागणीनुसार हे सेक्स रॅकेट रजनीश चालवत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली होती. त्याने शहरातील नामांकित वृत्तपत्रातही spa @your home या नावाने जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीद्वारे तो फोनवर ग्राहकांना मुलीचे फोटो पाठवून मागणीनुसार मुली हाॅटेलवर बुक केलेल्या खोलीवर पाठवायचा. त्या मुलींना ग्राहक थांबलेल्या हाॅटेलवर पाठवण्यासाठी या पाच महिला मदत करायच्या. मिलोफर सैय्यद (२०), प्रियांका वाघेला (१९), मानसी शेलार (१९), सोनिया गुप्ता (२५), साजिया गांधी (२६) अशी त्यांची नावे आहेत


पेनीनसुला ग्रँडमध्ये सेक्स रॅकेट

रजनीश साकिनाकाच्या पेनीनसुला ग्रँड हाँटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तीन मुलींची सुटका केली होती.  अटक केलेल्या पाच महिलांना प्रथम ग्राहक फोन करायचे. ग्राहकाच्या मागणीनुसार या पाच जणी संबधित मुलींना ग्राहक थांबलेल्या हाॅटेलवर पाठवयाचे, हे पीडित मुलींच्या चौकशीत उघड झालं. प्रत्येक ग्राहकामागे या पाच महिलांना पगाराव्यतिरिक्त टीप मिळायची. यातील मुख्य आरोपी रजनीशकडून पोलिसांनी १० मोबाइल, ४ लाख ७० हजार रुपये आणि काही औषधसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा  -

हसिना पारकरचा मुलगा पोलिसांच्या रडारवर

अंडरवर्ल्डमध्ये व्हाॅट्स अॅप रेकाॅर्डिंगचा ट्रेंड




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा