कार अपघातात 7 जखमी

 Tagore Nagar
कार अपघातात 7 जखमी
कार अपघातात 7 जखमी
कार अपघातात 7 जखमी
See all

विक्रोळी - विक्रोळीच्या कन्नमवार नगर २ मध्ये अपघात झाला आहे. अपघातात 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर राजावाडी आणि गोदरेज या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान शब्बीर सय्यद अली हे आपल्या कुटुंबासह ते त्यांच्या कारमधून जात असताना कारवरील नियंत्रण सुटले. त्यांची कार एका सायकल चालकाला धडकली, नंतर पुढे काही महिलांना धडकून एका रिक्षावर धडकल्याने हि रिक्षा बाजूच्या वडापावच्या गाडीवर उलटली.यात सात जण जखमी झाले असून दोन महिलांचा समावेश आहे. चालक ही जखमी झाला असून त्याला विक्रोळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Loading Comments