सुताराची आत्महत्या

 Pratiksha Nagar
सुताराची आत्महत्या
सुताराची आत्महत्या
See all

सायन - सायन येथील गांधी मार्केटच्या समोरील कृष्ण निकेतन इमारती जवळील नवीन बांधकाम इमारतीमधील एका सुताराने आत्महत्या केली. स्वतःला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे.सुखदेव असं या सुताराचे नाव आहे. इमारतीच्या वॉचमनने सुखदेवचा मृतदेह इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पाहिला आणि त्याने पोलिसांना खबर दिली. दरम्यान सुखदेवच्या मृत्यूचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. तरी सायन पोलीस याचा तपास घेत आहेत. सुखदेव हा बंगालवरुन कामानिमित्त मुंबईत आला होता आणि 6 महिन्यांपूर्वी सुखदेवचे लग्न झाले होते.

Loading Comments