...आणि अंधेरीत अचानक पेटल्या गाड्या!


SHARES

अंधेरी - पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांना अचानक आग लागल्याची घटना अंधेरी स्थानकासमोर असलेल्या मोती महल हॉटेल शेजारच्या गल्लीत घडली. सीएनजीमुळे जोरात स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. 

रविवारी सुट्टीच्या दिवस असल्याने नेहमीपेक्षा गर्दी कमी असल्याने एक संकट टळले. आगीमुळे वाहतूक कोंडी झाल्याने अंधेरीकरांना काही वेळ त्रास सहन करावा लागला. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने आग लवकर आटोक्यात आली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा