पोलिसांनी आवळल्या बोगस डॉक्टरांच्या मुसक्या, 'हे' दवाखाने तुमच्या परिसरात नाहीत ना?

मुंबईत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी दवाखाने खोलून नागरिकांना लुबाडत असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी आवळल्या बोगस डॉक्टरांच्या मुसक्या, 'हे' दवाखाने तुमच्या परिसरात नाहीत ना?
SHARES

मुंबईत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी दवाखाने खोलून नागरिकांना लुबाडत असल्याची माहिती समोर आली आहे. क्षमा क्लिनिक, आलिशा क्लिनिक, आसिफा क्लिनिक, रेहमत क्लिनिक, मिश्रा क्लिनीक अशी या दवाखान्यांची नावं आहेत.

वैद्यकीय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी किंवा शिक्षण नसताना मुंबईतील झोपडपट्टीच्या गजबजलेल्या परिसरात यांनी दवाखाने उघडले आहेत. या बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. मुंबईच्या गुन्हे शाखा ६ नं ही कारवाई केली आहे.

गुन्हे शाखा ६ चे पोलीस निरीक्षक हनमंतराव ननावरे आणि त्यांचे सहकारी नितीन सावंत यांना विश्वसनीय सूत्रांकडून शिवाजीनगर, गोवंडी परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याची माहिती मिळाली होती. हे बोगस डॉक्टर झोपडपट्टी परिसरात नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जास्तीचे पैसे घेऊन सर्वसामान्यांना लुबाडत होते.

संबंधित माहितीची खात्री केल्यानंतर मुंबई महापालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानं कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या एम-वॉर्ड पूर्व इथले सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया कोळी यांच्या नेतृत्वाखाली ५ वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली.

पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी यांनी एकत्रितपणे टाकलेल्या छाप्यात ५ वेगवेगळ्या ठिकाणी बोगस डॉक्टर रुग्णांची तपासणी करुन त्यांना औषधोपचार करताना रंगेहात पकडले गेले. या बोगस डॉक्टरांकडे कोणताही वैद्यकीय परवाना नव्हता.

तसंच महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलमध्ये नोंदणी नसताना डॉक्टर असल्याचं भासवून बेकायदेशिररित्या विविध आजारावरील रुग्णांना औषधं इंजेक्शन देवून औषोधोपचार करताना दिसून आले.

या बोगस डॉक्टरांच्या ताब्यातून स्टेथस्कोप, वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन बॉटल्स, अॅन्टीबायोटिक टॅबलेट्स, सर्जिकल ट्रे, पॅरासिटॉमॉल डेक्झा टॅबलेट्स, टोरमॉक्झिान ५०० एम.जी, सिरिन्स सलायन बॉटल्स, अॅन्टॉसिड्स टॅबलेट, बायेमेडिकल वेस्ट मटेरियल, रॅन्टीडाईन हायड्रोक्लोराईड इंजेक्शन असे वेगवेगळ्या प्रकारची औषधं आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.हेही वाचा

मुंबईतील पीएफ कार्यालयात २१ कोटींचा घोटाळा उघडकीस

अनिल देशमुख यांना फरार घोषित करा- किरीट सोमय्या

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा