अनिल देशमुख यांना फरार घोषित करा- किरीट सोमय्या

ईडीने अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावलं असून त्यांना बुधवार १८ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

अनिल देशमुख यांना फरार घोषित करा- किरीट सोमय्या
SHARES

सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्यान त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करावं, एवढंच नाही तर देशमुख हाती लागत नसल्यास त्यांना फरार घोषित करण्यात यावं, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याभोवतीचा अंमलबजावणी संचलनालया (ईडी)चा फास अधिकाधिक आवळला जात आहे. ईडीने अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावलं असून त्यांना बुधवार १८ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप अनिल देशमुख यांच्यावर केले आहेत. या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून अनिल देशमुख यांच्यावर ही कारवाई केली जात आहे. या कारवाईमध्ये ईडीनं आतापर्यंत अनिल देशमुख यांचं मुंबई-नागपूरमधील घर, कार्यालय, हॉटेल, कॉलेज अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. ईडीकडून पाठवण्यात येणाऱ्या समन्सला अनिल देशमुख प्रतिसाद देत नसल्यामुळे ईडीनं न्यायालयात देखील नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- विजय मल्ल्याच्या किंशफिशर हाऊसची ५२ कोटींना विक्री

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीच्या कारवाईविरोधात संरक्षण मिळावं, याची मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, सोमवारी न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यानंतर आता ईडीनं पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव व स्वीय सहाय्यक यांना आधीच अटक करण्यात आली आहे. सोबतच देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची सुमारे साडेचार कोटींची मालमत्तादेखील ईडीने जप्त केली आहे. 

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीच्या कारवाईविरोधात संरक्षण मिळावं, अशी मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, सोमवारी न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यानंतर ईडीनं अनिल देशमुख यांना पाचवं समन्स बजावलं आहे. या समन्सनुसार चौकशीला पुन्हा गैरहजर राहिल्यास त्यांच्याविरोधात 'लूक आऊट' नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. सध्या अनिल देशमुख यांचा ठावठिकाणा माहीत नसल्याचा ईडीचा दावा आहे.

हेही वाचा- सरकार धार्मिक स्थळे उघडत नाही, पण दारूची दुकानं उघडत; राम कदमांची सरकारवर टीका


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा