Advertisement

सरकार धार्मिक स्थळे उघडत नाही, पण दारूची दुकानं उघडत; राम कदमांची सरकारवर टीका

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर कोरोना निर्बंधामध्ये सूट देण्यात आली आहे.

सरकार धार्मिक स्थळे उघडत नाही, पण दारूची दुकानं उघडत; राम कदमांची सरकारवर टीका
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर कोरोना निर्बंधामध्ये सूट देण्यात आली आहे. त्यानुसार, अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकलपासून, दुकाने, हॉटेल यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पुन्हा एकदा धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

भाजपाचे आमदार राम कदम यांनी लोकांना धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

सरकार धार्मिक स्थळे उघडत नाही, पण दारूची दुकाने उघडण्यात आली आहेत. त्यांनी धर्मापेक्षा मद्यविक्रीला प्राधान्य दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली. राम कदम काही दिवसांपूर्वी प्रार्थनास्थळे लोकांसाठी खुली केली नाहीत तर ते इतर भाजपा नेत्यांसह १७ ऑगस्टला सिद्धिविनायक मंदिरात बळजबरीने प्रवेश करतील असा इशारा दिला होता.

त्यानंतर आता राम कदम यांनी मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी नियमांचे पालन करत जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

'आज मंगळवार आम्ही सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी नियमांचे पालन करत जाणार. प्रथम सकाळी १०. ४५ वाजता दादर पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन ११ वाजता सिद्धिविनायक मंदिरात नारळ, फुल, हार, नैवेद्य, दुर्वा घेऊन नियमांचे पालन करीत जाणार. बियर बार जर नियम आखून उघडता येऊ शकतात मग मंदिरे का नाहीत? याचे उत्तर ठाकरे सरकारने द्यावे. त्यांनी जरूर नियम करावेत आम्ही पालन करु.  मात्र टोकाचा तीव्र हिन्दू विरोध आम्ही सहन करणार नाही', असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळं राज्यात १५ ऑगस्टपासून अनलॉक अंतर्गत अनेक निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र, धार्मिक स्थळं उघडण्याबाबत सरकारनं कुठलाही निर्णय न घेतलेला नाही. त्यामुळे मंदिरं उघडण्यासाठी सुरुवातीपासून आग्रही असलेल्या भाजपाने सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा