गायक मिका सिंगच्या घरात चोरी


गायक मिका सिंगच्या घरात चोरी
SHARES

गायक मिका सिंग याच्या ओशिवारा येथील घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारणी मिका सिंग याच्या मॅनेजरनं ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरू आहे.

मिका सिंग याच्या घरातून चोरानी दोन लाखांचे दागिने आणि एक लाखाची रोकड लंपास केली आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मिका सिंगचा सहकारी घरात होता. त्याचवेळी चोरी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, ही चोरी कोणी केली त्याच नाव अद्याप समजलेलं नाही.


काय आहे सीसीटीव्हीत?

मुंबईतील मिका सिंग राहत असलेल्या इमारतीत सीसीटीव्ही असून ते सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. या फुटेजमध्ये संशयित व्यक्ती मिका याच्या घरात जाताना आणि घरातून बाहेर येताना दिसत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा