मध्य रेल्वेचा अधिकारी लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात

छाप्यादरम्यान सीबीआयला मुख्य यांत्रिक अभियंत्याकडून २३ लाख रुपये रोख आणि ४० लाख रुपयांचे दागिने सापडले आहेत. याशिवाय आरोपींच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेली ८ कोटींची मालमत्ता, तीन विदेशी बँक खाती सीबीआयने जप्त केली आहेत.

मध्य रेल्वेचा अधिकारी लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात
SHARES

मुंबईत मध्य रेल्वेच्या (Central Raillway) एका बडा अधिकारी सीबीआयच्या (CBI) जाळ्यात अडकला आहे. आपल्या ड्रायव्हरमार्फत एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

अशोक कुमार गुप्ता असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो रेल्वेत प्रिन्सिपल चीफ मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून रेल्वेत कार्यरत आहे.

अशोक कुमार गुप्ताच्या ड्रायव्हरला देखील सीबीआयने अटक केली आहे. ड्रायव्हर देखील मध्य रेल्वेत कामाला आहे. तसेच कोलकाता येथील एका प्रायव्हेट कंपनीच्या अधिकाऱ्याला देखील अटक करण्यात आली आहे.

अशोक कुमार गुप्ताकडे मेकॅनिकल डिपार्टमेंटने दिलेल्या सर्व कंत्राटाची बिल्स क्लिअर करण्याचे अधिकार होते. त्यामुळे अशाच एका कंत्राट दिलेल्या कंपनीचे बिल क्लिअर करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच गुप्ताने घेतली होती.

गुप्ताने लाच घेतलेले एक लाख रुपये सीबीआयने हस्तगत केले आहेत. तसेच मुंबई, कोलकाता, गाझियाबाद, नोएडा, देहरादून आणि दिल्ली अशा शहरातील वेगवेगळ्या दहा ठिकाणी सीबीआयनो छापेमारी केली.

छापेमारीत तब्बल 23 लाखांची रोकड, चाळीस लाखांचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने, आठ कोटींची इन्व्हेस्टमेंट डिटेल्स, पाच कोटीची नोएडा, हरिद्वार, देहरादून आणि दिल्ली येथील घर आणि जमिनीची कागदपत्रे जप्त केली आहेत.

इतकेच नाही तर गुप्ताचे तीन विदेशी बँकेमध्ये अकाउंट्स आहेत. सिंगापूर आणि अमेरिकेतील याच बँक अकाउंट्समध्ये दोन लाख यू एस डॉलर्स इतकी रक्कम देखील आहे. तसेच गुप्ताच्या कुटुंबाचे विदेशात देखील बँक अकाऊंट आहेत.सोबत एक लॉकर देखील सी बी आयला सापडले आहे.



हेही वाचा

महिलांच्या बाथरूममध्ये डोकावणाऱ्या आयआयटी बॉम्बे कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला अटक

पश्चिम रेल्वेवर आणखी ३१ वातानुकूलित लोकल फेऱ्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा