SHARE

मुंबई - केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने 900 कोटींच्या लोन चुकवेगिरी प्रकरणी विजय मल्ल्यासह किंगफिशर एअरलाइन आणि आयडीबीआयचे माजी अध्यक्ष योगेश अगरवाल यांच्या विरोधात मंगळवारी आरोपपत्र दाखल केले गेले. या आरोपत्रात आयडीबीआय आणि किंगफिशरच्या माजी अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. 1 हजार 100 पानांच्या आरोपपत्रात 11 आरोपींची नावे आहेत. सीबीआयने आयडीबीआय कंपनीच्या पाच, तर विजय मल्ल्या आणि त्याच्या किंगफिशर एअरलाइन कंपनीच्या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

सोमवारी सीबीआयने आयडीबीआयचे माजी अध्यक्ष आणि आयडीबीआयच्या तीन माजी अधिकाऱ्यांसह किंगफिशरच्या चार माजी अधिकाऱ्यांना अटक केली होती. मंगळवारी या सगळ्यांना मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आलं. या अटकसत्रात आयडीबीआयचे माजी अध्यक्ष योगेश अगरवाल आणि किंगफिशरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ए. रघुरामन यांचा समावेश होता. मात्र न्यायालयात हजार केल्यानंतर सीबीआयने कुणाच्याही सीबीआयच्या कोठडीची मागणी न केल्याने अखेर न्यायालयाने या सगळ्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या