छोटा राजनवर गुन्हा दाखल

 Pali Hill
छोटा राजनवर गुन्हा दाखल

मुंबई - १९९३ मुंबई ब्लास्टचा आरोपी असलेल्या हनीफ कडावालाच्या हत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाने आपल्या हाती घेतला असून, सीबीआयने याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर गुन्हा दाखल केला आहे.अभिनेता संजय दत्तला एके ५६ बंदूक हनीफने दिली होती, तसेच संजय दत्तच्या गॅरेजमध्ये हत्यारांचा साठा ठेवण्याचा आरोप देखील हनीफ कडावाला वर होता. १९९३ मुंबई ब्लास्टनंतर एप्रिल महिन्यात कटाचा भाग असल्याचा तसेच गुजरात वरून हत्यारे आणल्याचा ठपका ठेवत हनीफला टाडा अंतर्गत अटक करण्यात आली होती, पाच वर्षांनी हनीफला बेल मिळाली होती. सात फेब्रुवारी २००१ साली वांद्रे येथील ऑफिसमध्ये हनीफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सुरुवातीपासूनच छोटा राजनवर संशय होता.त्यामुळेच राजनसह सीबीआयने त्याचा हस्तक गुरु साटमवर देखील गुन्हा दाखल केला आहे.

Loading Comments