फुकट्या प्रवाशांकडून मध्य रेल्वेची १०० कोटींची वसुली

विशेष तिकीट तपासणींसांच्या मदतीनं ६ महिन्यांत मध्य रेल्वेच्या सर्व विभागांनी मिळून फुकट प्रवाशांकडून १०० कोटींची वसुली केली आहे.

फुकट्या प्रवाशांकडून मध्य रेल्वेची १०० कोटींची वसुली
SHARES

रेल्वेनं विनातिकीट प्रवास करणाऱ्या फकट्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या फकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनानं विशेष तिकीटतपासणीसांची नियुक्ती केली आहेया विशेष तिकीट तपासणींसांच्या मदतीनं ६ महिन्यांत मध्य रेल्वेच्या सर्व विभागांनी मिळून फुकट प्रवाशांकडून १०० कोटींची वसुली केली आहे. या प्रवाशांमध्ये तोतया पोलिस व तिकीटतपासणीसांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. 

विनातिकीट प्रवास

मागील काही महिन्यांपासून अनेक प्रवासी विनातिकीट आणि प्रथम दर्जाच्या डब्यातून विनातिकीट प्रवास करत असल्याच्या तक्रारी रेल्वेकडं येत होत्या. रेल्वेनं प्रवाशांच्या वारंवार येणाऱ्या या तक्रारींची दखल घेत फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी तिकीटतपासणीसांचं विशेष पथक स्थापन केलं. यामध्ये महिलांच्या तेजस्विनी पथकांपासून ते मुख्यालयातील विशेष पथकाचा समावेश आहे.

दंड वसुलीत वाढ

१ एप्रिल ते २४ सप्टेंबर या कालावधीत दंड वसुलीत गतवर्षीच्या तुलनेत १३.९९ टक्क्यांनी वाढ झाली. मुंबई विभागानं ८.१३ लाख विनातिकीट प्रवाशांकडून ४१.२५ कोटी आणि मुख्यालयातील विशेष पथकानं १.४५ फुकट्यांकडून ९.८८ कोटींची वसुली केल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली आहे. तसंच, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने ऑगस्टमध्ये २ लाख ३ हजार प्रवाशांकडून ९ कोटी ११ लाखांची वसुली केल्याचं माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनानं दिली आहे.हेही वाचा -

मुंबईचा पाणी प्रश्न मिटला, वर्षभर मिळणार विनाकपात पाणी

मुंबईत गुरूवारी गडगडाटासह पावसाचा इशाराRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा