ओमकार रियल्टर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय ३० जानेवारीपर्यंत कोठडी


ओमकार रियल्टर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय ३० जानेवारीपर्यंत कोठडी
SHARES

येस बँक कर्जप्रकरणी सक्त वसुली संचलनालयाने(ईडी) ओमकार रिएल्टर्स अॅड डेव्हलपर्सचे अध्यक्ष कमल किशोऱ गुप्ता व व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा या दोघांनाही विशेष न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. दोघांनाही गुरूवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते..

२५ जानेवारीला याप्रकरणी ईडीने १० ठिकाणी शोध मोहिम राबवली होती. झोपडपट्टी पुनर्वसनासाठी येस बँकेकडून घेण्यात आलेले ४५० कोटी रुपयांचे कर्ज दुस-या कामासाठी वापरण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.  कंपनीने नियमभंग करून इतर बँकाकडूनही कर्ज घेतले होते, असा आरोप आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात एक रीट पिटीशन दाखल करण्यात आली होती. कंपनीने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून त्यांच्याकडून असा कोणताही गैरव्यवहार करण्यात आलेला नसल्याचे सांगितले. तसेच पेटीशनमधील सर्व आरोपही त्यांनी फेटाळून लावले आहेत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा