चंद्रकांत शिंदे यांच्यावर कारवाई होणार - आशिष शेलार

 Mumbai
चंद्रकांत शिंदे यांच्यावर कारवाई होणार - आशिष शेलार

मुंबई - वांद्रे पूर्व येथील पूनर्विकासाच्या प्रकल्पात म्हाडाचे नाव प्रॉपर्टी कार्डवर लावण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या सिटीसर्व्हे ऑफिसर चंद्रकांत शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात येईल, तसेच प्रलंबित एन.ए. टॅक्सवरील दंडात्मक रक्कम रद्द करण्यात येईल असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी विधानसभेत जाहीर केले. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी हा भ्रष्टाचार विधानसभेत मांडला होता.

शनिवारी विधानसभेत अर्थसंकल्पावर विभागवार चर्चा करण्यात आली. या चर्चेत भाग घेताना आमदार आशिष शेलार यांनी विविध विषयांवर सरकारचे लक्ष वेधले. त्यामध्ये वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या जमिनीवरील पूनर्विकासाच्या प्रकल्पामध्ये त्या प्रकल्पाच्या प्रॉपर्टी कार्डवर म्हाडाचेच नाव लावण्यासाठी संबंधितांकडे सिटीसर्व्हे ऑफिसर चंद्रकांत शिंदे यांनी एक कोटींची मागणी केल्याची गंभीर बाब आमदार आशिष शेलार यांनी उघड केली. त्याची सरकारने तातडीने दखल घेतली. तर मुंबईतील जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांना लावण्यात येणारा एन.ए. टॅक्सला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. गावठाण आणि कोळीवाडे नॉटीफाय करणे आवश्यक असून, हे काम येत्या 3 महिन्यात महसूल विभागाने करावेत असे सांगत त्यांनी मुंबईतील लीसच्या जागांचे भाडे 140 टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ही वाढ अवाजवी असून, ती कमी करण्यात यावी, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांनी ही वाढ माफक असावी असे सूचित केले आहे. 1 टक्क्याऐवजी ही वाढ जर माफक केली तर त्याला लीस धारकांचा विरोध होणार नाही. याकडे लक्षवेधीत आमदार आशिष शेलार यांनी 140 टक्के वाढ कमी करावी ही मागणी केली.

Loading Comments