'ठकठक' गँगने अभिनेत्याला लुटले

 Dahisar East
'ठकठक' गँगने अभिनेत्याला लुटले

कदाचित आपण 'ठकठक' गँग हे नाव ऐकलं असेलच. आता या 'ठकठक' गँगने चक्क एका अभिनेत्याला लुटल्याची घटना समोर आली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून, सब टीव्हीवरील सध्या गाजत असलेल्या 'चिडिया घर' या मालिकेतील सुमित अरोडा आहे. ही घटना मुंबईच्या दहिसर टोलनाक्याजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास सुमित गोरेगाव आरे कॉलनीमधून आपलं शुटींग संपवून घरी जात होते. त्यावेळी दहिसर टोलनाक्यावर त्यांची गाडी येताच एका व्यक्तीने जोरात गाडीची काच ठोकायला सुरुवात केली. ज्यावेळी सुमितने आपल्या गाडीची काच खाली घेतली तेव्हा तू माझ्या पायावर गाडी घातलीस असं सांगत हा इसम त्यांच्याशी जोरजोरात भांडू लागला. सुमितने याबाबत माफी देखील मागितली. 

मात्र त्याचवेळी दुसऱ्या बाजूने अजून एक व्यक्ती आली आणि त्याने सुमित यांना बोलण्यात गुुंग करून ठेवले. याचाच फायदा घेत पहिल्या व्यक्तीने त्याचे पाकिट आणि मोबाईल अलगद काढला. जेव्हा ही बाब सुमित यांच्या लक्षात आली, तोपर्यंत विलंब झाला होता. या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेल्या सुमित अरोडा यांनीे मोबाईल नंबर आणि डेबिट कार्ड ब्लॉक केलं आहे.

Loading Comments