ट्रॉम्बेच्या पायलीपाड्यातून अल्पवयीन मुलाचे अपहरण


SHARE

एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना ट्रॉम्बेतल्या पायलीपाडामध्ये बुधवारी घडली. याप्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी देखील याची गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

हरवलेला शहानवाज (13) ट्रॉम्बेतल्या सुलतान चाळ येथे त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. ट्रॉम्बेतल्या सी सेक्टर परिसरात असलेल्या मदरशामधील काही मित्रांसोबत बुधवारी खेळायला गेला होता. बराच वेळ झाल्यानंतरही तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी मित्र आणि काही नातेवाईकांच्या घरी त्याचा शोध घेतला. तरीही तो सापडला नाही, त्यामुळे बुधवारी रात्री शहनवाजच्या कुटुंबियांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात जाउन त्याच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या