ग्रांट रोड - दुसरा कुंभारवाडा परिसरात चोरट्यांनी दुकान फोडून एक लाख 22 हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
चंपालाल देवदास यांच्या दुसऱ्या कुंभारवाड्यातील नवसारीवाला बिल्डिंगमधील शॉप नंबर दोनमध्ये ही चोरी झाली. चंपालाल यांनी सोमवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
