'तमाशा' पबमधील 'पेपर स्प्रे' प्रकरणाला क्लिन चिट


'तमाशा' पबमधील 'पेपर स्प्रे' प्रकरणाला क्लिन चिट
SHARES

कमला मिल कंपाऊंडमधील तमाशा पबमध्ये काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने 'पेपर स्प्रे' फवारल्याच्या संशयावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. काही क्षणासाठी पब रिकामी करण्यात आले होते. या घटनेची गंभीर दखल घेत पब मालकाने पोलिसात धाव घेत, चौकशीसाठी पालिका आणि अग्निशमन दलाचीही मदत घेतली होती. सीसीटीव्ही तपासून पालिका आणि अग्निशमन दलाने सादर केलेल्या अहवालात काहीही ठोस अाढळले नसल्याचे पोलिसांनी म्हटले अाहे. त्यामुळे तमाशा पबमध्ये घटलेल्या प्रकरणाला पोलिसांनी 'क्लिन चिट' दिली अाहे.


पबमध्ये अनुभवला ठसका, खोकला

वरळीतल्या कमला मिल कंपाऊंडमधील तमाशा पबमध्ये २६ मार्च रोजी ग्राहक डीजेच्या तालावर ठेका धरत असतानाच अचानक रात्री १२ वाजून १२ मिनिटांनी सर्व जण खोकू लागले तर अनेकांना ठसका लागला. कुणीतही पेपर स्प्रेचा वापर केला, हे कळल्यावर सर्वत्र पाहणी सुरू झाली. किचनमध्ये काहीतरी घडले, असे सुरुवातीला वाटले. पण प्राथमिक तपासणीत काहीही अाढळून अाले नाही.


सीसीटीव्हीद्वारे पाहणी

२० मिनिटांच्या कालावधीनंतर पब पुन्हा सुरू झाल्यावर ग्राहकांना कोणताही त्रास झाला नाही. या प्रकाराची सीसीटीव्ही आणि इतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे तपासणी करण्यात अाली. ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिल्यानंतर पालिका व अग्निशमन दलाने पबमध्ये जाऊन घटनेची पाहणी केली. दोघांच्या अहवालात काहीही आढळून आले नाही. तर सीसीटीव्हीतही पोलिसांना काहीही आढळले नाही. अखेर या प्रकरणावर पोलिसांनी पडदा टाकायचे ठरवले आहे.


हेही वाचा -

'तमाशा'त घडला 'तमाशा'

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा