यू.पी. पोलिसांना धमकी, 'त्या' आरोपीला सोडा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील,


यू.पी. पोलिसांना धमकी, 'त्या' आरोपीला सोडा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील,
SHARES
कट्टर हिंदूत्वाचे प्रचारक आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंञी योगी आदीत्यनाथ यांना जिवे ठार मारण्यास महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने शुक्रवारी अटक करत, त्याचा ताबा यूपी एटीएसला दिला. या कारवाईनंतर अवघ्या काही तासात यूपीच्या लखनऊ पोलिस मुख्यालयात 'योगी यांना धमकवणाऱ्यास सोडा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा धमकीचा आणखी एक फोन आल्याने यूपी प्रशासन पून्हा कामाला लागले आहे. 

 

यूपीत आधीच कोरोनाने हाहाकार माजवला असताना, उत्तरप्रदेशचे मुख्यमंञी योगी आदीत्यनाख हे कोरोना संसर्ग रोगावर नियंञण मिळवण्यासाठी प्रशासनामार्फत शर्तीचे प्रयत्न करत आहेत. त्यातच मुंबईसह इतर प्रमुख राज्यातून उत्तरप्रदेशमध्ये लोंढेच्या लोढे परतत आहे. अशातच लखनऊच्या पोलिस मुख्यालयात योगी आदीत्यनाथ यांना बाँम्बने उडवून ठार मारण्याची धमकीचा फोनने उत्तरप्रदेश  पोलिसांची झोप उडाली होती. उत्तरप्रदेश एटीएसने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, आदीत्यनाथ यांची रातोरात सुरक्षा वाढवली. तपासात हा फोन मुंबईच्या चुनाभट्टी परिसरातून आल्याचे कळताच, यू पी एटीएसने  मुंबई एटीएसच्या मदतीने कामरान आमीर खान (25) याला अटक करत त्याचा ताबा यूपी एटीएसला दिला.

 ही कारवाई होऊन काही तास उलटत नाही. तोच यूपीच्या लखनऊ पोलिस मुख्यालयाच्या मदत केंद्रावर आणखी एक धमकीवजा फोन आला. त्यात मुख्यमंञी योगी आदीत्यनाथ यांना धमकवणाऱ्यास सोडा, अन्यथा परिणाम वाईट होतील असे धमकवून फोन कट करण्यात आला. या फोननंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. दुसऱ्यांदा आलेला फोन ही महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातून आल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार महाराष्ट्र एटीएसच्या नाशिक येथील पथकाने धमकी देणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. अधिक चौकशीसाठी त्याचा ही ताबा महाराष्ट्र एटीएसने यू.पी एटीएसकडे सोपवला आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात धमकी देणे व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा