अंगावर नारळ पडून दोन विद्यार्थिनी जखमी

Ghatkopar
अंगावर नारळ पडून दोन विद्यार्थिनी जखमी
अंगावर नारळ पडून दोन विद्यार्थिनी जखमी
See all
मुंबई  -  

अवघ्या काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये झाड पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्याला एक आठवडा होत नाही तोच दोन शाळकरी मुलींच्या अंगावर नारळ पडल्याने त्या जखमी झाल्या. ही घटना घाटकोपरच्या माता रमाबाईनगरमध्ये घडली.

फराह सलीम सय्यद आणि प्रणाली मोरे या दोघीही 5 वर्षांच्या आहेत. त्या दोघीही घाटकोपरच्या माता रमाबाईनगर येथील त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले जॉय मॅक्स इंग्लिश हायस्कूलमध्ये सिनियर केजीच्या वर्गात शिकतात. या शाळेच्या छतावरच नारळाचे झाड आहे. त्या दोघीही शाळेच्या आवारात असताना त्यांच्या अंगावर दोन नारळ पडल्याने दोघीही जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या उपचारानंतर दोघींनाही घरी सोडण्यात आले आहे.


या प्रकरणात या झाडाचे मालक सुरेश शेखर पुजारी (35) याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवून त्याला पंतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


हेही वाचा -

मुंबई, तुला झाडांवर भरवसा नाय काय? वर्षाला 31 कोटी खर्च, तरीही पडझड!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.