भायखळ्यात लांब केसांमुळे ओढवला मृत्यू


भायखळ्यात लांब केसांमुळे ओढवला मृत्यू
SHARES

भायखळा - एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी भायखळा स्थानकाजवळ घडली. सागर अरविंद भोसले (वय -17) असे त्याचे नाव असून तो धारावीतल्या शास्त्रीनगर येथे राहतो. तर सिद्धार्थ महाविद्यालयात इयत्ता 11 वी तो शिकत होता.

सोमवारी दुपारी आपल्या चार कॉलेजच्या मित्रांसह मोबाईलची बॅटरी आणण्यासाठी मस्जिद बंदर येथील मनीष मार्केटला जाण्यासाठी निघालेल्या सागर भोसलेवर काळाने झडप घातली. तो लोकलच्या दरवाज्याजवळ खांबाला धरून उभा असताना हवेत उडणारे स्वतःचे लांब केस सावरण्यासाठी त्याने हात बाहेर काढला असता त्याला लोहमार्गावरील खांबाचा जोराचा फटका बसला. हा प्रकार मित्रांना समजताच त्यांनी सागरला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केलं. पण, त्याआधीच सागरचा मृत्यू झाला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा