तुमच्या ऑनलाईन डेटाची चोरी होऊ शकते!

गोरेगाव - बांगुरनगर येथील भूताडिया रेफ्रिजिरेटर प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कंपनीच्या मालकानेच डाटा चोरीचा आरोप केला आहे. कंपनीचे मालक अशोक भूताडिया यांनी सुनील सुराना यांच्या सोबतच दोघांवर हा आरोप केलाय. विशेष म्हणजे सुनील सुराना हे अशोक भूताडिया यांचे नातेवाईकच असल्याचे समोर आले आहे.

कंपनीचा महत्त्वपूर्ण डाटा आणि माहिती या तिघांनी चोरली. त्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे, असे कंपनीचे मालक अशोक भूताडिया यांनी सांगितले. याप्रकरणी आयटी अॅक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Loading Comments