'त्या' आक्षेपार्ह ट्विटविरोधात कारवाईची मागणी


'त्या' आक्षेपार्ह ट्विटविरोधात कारवाईची मागणी
SHARES

सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर कोण कधी काय पोस्ट टाकेल याचा काही नेमच नसतो. कित्येकदा सामाजिक जबाबदारी विसरून केलेल्या पोस्ट व्हायरल होतात. त्यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटतं. रोहित सरदाना नावाच्या एका नावाजलेल्या पत्रकारानेही अशाच प्रकारे ट्विट केलं आणि ते चांगलंच व्हायरल झालं. आता त्याच्या विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.या ट्रस्टकडून कारवाईची मागणी

16 नव्हेंबरला रोहित सरदाना यांनी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमुळे मुस्लिम समाजासह हिंदू आणि ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा अंजुमन-ए-खादिम-ए-हुसैन ट्रस्टनं केला आहे. या ट्रस्टने मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात रोहीत सरदाना विरोधात लेखी तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे.


देवी-देवतांबाबत केलं होतं ट्विट

16 नोव्हेंबरला रोहीत सरदाना यांने हिंदू देवी-देवतांबाबत एक ट्विट केलं होतं. ज्यात त्यांनी इतर धर्मांबाबतदेखील टिप्पणी केली होती. सरदाना याने केलेले हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं. त्यामुळे सरदना यांना टिकेला सोमोरं जावं लागलं.


नाहीतर आंदोलन करू

सरदानाने आमच्याच नाही तर हिंदू आणि ख्रिश्चन धर्मियांच्या देखील भावना दुखावल्या आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा अंजुमन-ए-खादिम-ए-हुसैन ट्रस्टचे ट्रस्टी अझीज विरानी यांनी दिला आहे.

संबंधित विषय