वीजचाेरी प्रकरण उघडकीस

 Mumbai
वीजचाेरी प्रकरण उघडकीस

अन्टाँप हिल - शेख मिसरी राेडजवळील म्हाडा कॉलनीत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेलं वीज चाेरीचं प्रकरण उघडकीस आलंय. ३० नाेव्हेंबर राेजी सकाळी अन्टाँप हिल पाेलीस आणि बेस्ट दक्षता विद्युत पथकानं या परिसरात छापे टाकत २७ जणांवर गुन्हा दाखल केला. दाेन वर्षाआधीही या विज चाेरी प्रकरणात ७४ जणांवर गुन्हा दाखल झाला हाेता. पण अजूनही त्यांच्याविरोधात कारवाई झालेली नाही. विजचाेरीे प्रकरणाबाबत बेस्टनं संबंधितांना नाेटीस बजावली आहे तर, लवकरच या प्ररकणाची तपासणी करून संबंधितांना अटक करण्यात येईल असं आश्वासन अँटॉप हिल पाेलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अरविंद मसलकर यांनी दिलं.

Loading Comments