परदेशी बँकेच्या फसवणुकीप्रकरणी कुरिअर कंपनीवर गुन्हा

बीकेसी परिसरातील परदेशी बँकांचे डीडी चोरून ८४ लाखांना बँकेला गंडा घालणाऱ्या कुरिअर कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मागील दोन महिन्यांपासून ही फसवणूक सुरू होती. या फसवणुकीदरम्यान कुरिअर कंपनीने बँकेचे १ हजार २३१ डीडी चोरून ही फसवणूक केल्याचं तपासात पुढे आलं आहे.

परदेशी बँकेच्या फसवणुकीप्रकरणी कुरिअर कंपनीवर गुन्हा
SHARES

बीकेसी परिसरातील परदेशी बँकांचे डीडी चोरून ८४ लाखांना बँकेला गंडा घालणाऱ्या कुरिअर कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मागील २ महिन्यांपासून ही फसवणूक सुरू होती. या फसवणुकीदरम्यान कुरिअर कंपनीने बँकेचे १ हजार २३१ डीडी चोरून ही फसवणूक केल्याचं तपासात पुढे आलं आहे. या प्रकरणी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.


कंपनीकडून गंडा

बीकेसी परिसरात ब्रिटिश मल्टीनॅशनल बँकींग आणि फायनॅन्शिअल सर्व्हिस कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. या बँकेने फेब्रुवारी आणि मार्च या २ महिन्यात सहकारी बँकेच्या नावाने १ हजार २३१ डीडी काढले होते. ते डीडीही बँक याच कुरिअर कंपनीद्वारे पाठवते. मात्र कुरिअर कंपनीद्वारे पाठवेले पैसे सहकारी बँकांपर्यंत पोहोचलेच नाही. ज्या कंपनीला हे चेक पोहोचवण्याची जबाबदारी दिली होती. त्यानी परस्पर ५ ते ६ सहकारी बँकांमधून चेकवरील सर्व रक्कम वटवून घेतली. एवढ्यावरच न थांबता ज्या बँकांना हे चेक पाठवले जाणार होते, त्यांना पुढे बनावट डीडी देण्यात आले.


८४ लाखांची फसवणूक

पैसे आले नसल्याचे कळवल्यानंतर परदेशी बँकेनं याबाबत चौकशी केली. त्यावेळी हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. त्यानंतर परदेशी बँकेच्या पदाधिकाऱ्यानं बीकेसी पोलिस ठाण्यात कुरिअर कंपनी विरोधात तक्रार नोंदवली आहे. एकून ८४ लाख ३० हजार रुपयांची ही फसवणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी बीकेसी पोलिस अधिक तपास करित आहेत.




हेही वाचा -

३३ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

'झी' आणि 'अँड टीव्ही'ला राज्य निवडणूक आयोगाची नोटीस



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा