शिक्षकाने केला १४ हून अधिक विद्यार्थीनींचा विनयभंग

शिक्षकानेच (teacher) १४ हून अधिक विद्यार्थीनींचा (girl student) विनयभंग (molestation) केल्याची संतापजनक घटना नवी मुंबईत समोर आली आहे.

शिक्षकाने केला १४ हून अधिक विद्यार्थीनींचा विनयभंग
SHARES

शिक्षकानेच (teacher) १४ हून अधिक विद्यार्थीनींचा (girl student) विनयभंग (molestation) केल्याची संतापजनक घटना नवी मुंबईत समोर आली आहे. नवी मुंबईतील (navi mumbai) पालिकेच्या एका शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी लोचन परुळेकर या शिक्षकाला तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

या  शिक्षकाने ६ वी ते ८ वी तील १४ पेक्षा अधिक विद्यार्थिनींचा विनयभंग (molestation) केल्याचा आरोप आहे. मागील २ महिन्यांपासून तो हे कृत्य करत होता. नवी मुंबईतील तुर्भेतील एका पालिका शाळेत एसआरएच्या फंडातून संगणक देण्यात आलेले होते. हा नराधम शिक्षक  ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थींनींना संगणक (computer) शिकवण्यासाठी येत होता. मुलींना संगणक शिकवत असताना तो अश्लील चाळे करायचा. मुलींनी शिक्षकांना हा प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.

विद्यार्थींनीनी सुरुवातीला याची वाच्यता केली नाही. मात्र हा प्रकार अधिकच वाढू लागल्याने या विद्यार्थींनीनी शिक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर शाळेने नवी मुंबईत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकाने आणखी किती विद्यार्थिनींचा विनयभंग केला याचा पोलीस तपास करत आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर नवी मुंबईत संताप पसरली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.



हेही वाचा -

नवऱ्याशी चुकामूक झालेल्या महिलेवर तिघांचा बलात्कार

राज्यातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसवणार- गृहमंत्री




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा