COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

नवऱ्याशी चुकामूक झालेल्या महिलेवर तिघांचा बलात्कार


नवऱ्याशी चुकामूक झालेल्या महिलेवर तिघांचा बलात्कार
SHARES

नवऱ्याशी चुकामूक झालेल्या एका १९ वर्षीय महिलेवर तिघा जणांनी बलात्कार (rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिघा आरोपींनी या महिलेला (women) रेल्वे स्टेशनजवळ सोडण्याचा बहाणा दोन तासात दोन वेळा बलात्कार केला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 

१८ फेब्रुवारीला ही घटना घडली. नाशिक येथे राहणारी महिला आपल्या पतीसह घाटकोपर येथे गेली होती. मात्र, लोकल ट्रेन पकडताना तिची आणि नवऱ्याशी चुकामूक झाली. त्यानंतर ती रात्री मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरली. मात्र, तिच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे आपले कानातील सोन्याचे दागिने मुंब्रा येथे विकण्याचा प्रयत्न केला. कोणीच  दागिने विकत घेण्यास तयार नसल्याने तिने एका रिक्षाचालकाला विनंती केली. मात्र, रिक्षाचालकाने महापे येथील निर्मनुष्य ठिकाणी नेऊन बलात्कार केला. त्यानंतर तिचे दागिने विकून पैसे आणतो असं सांगून पळून तो गेला.

दागिनेही गेले आणि पैसेही नसल्याने या महिलेने स्कुटीवरून जाणाऱ्या दोघांना जवळच्या रेल्वे स्थानकात सोडण्याची विनंती केली. मात्र, या दोघांनी हायवेजवळच्या झाडीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. अखेर या महिलेने घणसोली रेल्वे स्थानक गाठलं आणि इतर प्रवाशांच्या मदतीने ती ठाणे मार्गे नाशिकमधील आपल्या घरी पोहचली. तिने घरी गेल्यानंतर हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवरून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ऑटो रिक्षामधील दोन बाहुल्या आणि दोन झेंड्यांच्या ओळखीवरून रिक्षाचालकाला २४ तासात अटक केली. त्यानंतर इतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.हेही वाचा -

मॉलमधील एस्केलेटरमध्ये चिमुकल्याची तीन बोटं तुटली

राज्यातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसवणार- गृहमंत्री
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा