Advertisement

महिलांना फसवणारा गजाआड


महिलांना फसवणारा गजाआड
SHARES

जोगेश्वरी - शादी डॉट कॉम आणि जिवनसाथी डॉट कॉम या वेबसाईट्सवरून आेळख काढून महिलांची फसवणूक करणारा गजाआड झाला आहे. फिरोज अहमद नियाज शेख असं या इसमाचे नाव आहे. एअरपोर्ट पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जोगेश्वरीतल्या मेघवाडी परिसरात हा बामटा राहतो. फिरोज हा लग्नाच्या संकेत स्थळांवर खोटे प्रोफाईल बनवून महिलांना लग्नाचे अमिष दाखवायचा. त्यानंतर महिलांकडून पैसे, मोबाईल, लॅपटॉप या वस्तूंची लूट करून पलायन करायचा. आतापर्यंत तब्बल ९ महिलांची याने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. तसेच अन्य एका गुन्ह्यात बांगुरनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती.

संबंधित विषय
Advertisement