तरुणीशी अश्लील चाळे, रोडरोमियोसह पोलिसालाही अटक

तरुणीची छेड काढणे, अश्लील हावभाव करण्यात रोड रोमियोसह आता पोलिस ही मागे राहिलेले नाहीत

तरुणीशी अश्लील चाळे, रोडरोमियोसह पोलिसालाही अटक
SHARES

‘महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित शहर’ असं बिरूद मिरवणा-या मुंबईत महिलांविरोधी गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरुणीची छेड काढणे, अश्लील हावभाव करण्यात रोड रोमियोसह पोलिस ही मागे राहिलेले नाहीत. नेहरूनगरमध्ये तरुणी समोर संपूर्ण कपडे काढून अश्लील हावभाव करणाऱ्या पोलीस शिपाया विरोधातच गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर नवघरमध्ये एटीएममध्ये महिलेसमोर अश्लील हावभाव करणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत.


दारूच्या नशेत

नेहरूनगर पोलिस वसाहतीत राहणारे हरिशचंद्र लहाने (४१) हे सध्या पंतनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. लहाने हे दारूच्या आहारी गेल्याने त्याची पत्नी वर्षभरापूर्वीच घर सोडून गेली होती. त्यामुळे सध्या हरिशचंद्र हे एकटेच राहतात. शनिवारी रात्री लहाने घरी जात होता. दारूच्या नशेत असलेल्या हरिशचंद्र यांना चालण्याची ही शुद्ध नव्हती. त्याच दरम्यान लहाने यांच्या शेजारी राहणारी २३ वर्षीय तरुणी त्याच्या इमारतीतील इतर महिलांसोबत गप्पा मारत होती. त्यावेळी अचानक हरिश्चंद्र त्या तरुणीला शिवीगाळ करू लागला. ऐवढ्यावरच न थांबता त्याने तिच्या समोर स्वतःचे पूर्ण कपडे काढले आणि तिच्याकडे बघून अश्लील हावभाव करत होता. तरुणीने या प्रकरणी नेहरूनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी पोलिस शिपाई हरीशचन्द्र यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.


एटीएमही असुरक्षित

मुलुंडच्या नवघर परिसरात २३ वर्षीय तरुणी शनिवारी रात्री मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. घरी परतताना रात्रीच्या दोन वाजता ती हरिओम नगर येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली असताना. एटीएममध्ये पैसे काढताना तिला अडचणी येत होत्या. याच संधीचा फायदा घेत तिच्याशी जवळीकता साधत, तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरूवात केले. ऐवढ्यावरच न थांबता त्याने तरुणीसमोर अश्लीलकृत्य करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तरुणीने प्रसंगावधान दाखवून त्या तरुणाची सर्व अश्लील चाळे मोबाइलमध्ये टिपले. तिने रस्त्यावर आरडा ओरडा करताच आरोपीने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.  त्यावेळी जवळील गस्तीवर असलेल्या पोलिसांकडे तरुणीने मदत मागितल्यानंतर पळून जात असलेल्या आरोपीला कोपरी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.



हेही वाचा-

व्हायरल व्हिडिओ अंगलट, विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्या पोलिसावर कारवाई




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा