मनीट्रान्सफर कंपन्यांकडून लूटमार


मनीट्रान्सफर कंपन्यांकडून लूटमार
SHARES

चेंबूर - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी बँकामध्ये मोठी गर्दी आहे. याचा गैरफायदा मात्र काही मनीट्रान्सफर कंंपन्या घेतायेत. चेंबूरच्या वाशी नाका इथल्या शंकर देऊळ परिसरातली हर्षा ऑनलाइन मनीट्रान्सफर कंपनी अशीच लूट करत होती. गावी पैसे पाठवण्यासाठी नागरिकांनी मनीस्ट्रान्सफरचा पर्याय निवडला खरा, पण 20 हजारांच्या जुन्या नोटांपाठी तब्बल पाच हजारांचं कमिशन घेण्यात येतंय. याला मनसेचे हेमंत अभनावे, संतोष पवार आणि देवेंद्र पांडे यांनी विरोध केला आणि कंपनी बंद केली. याविरोधात त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केलीय.

संबंधित विषय