गस्तीवर असलेल्या पोलिसाला कोरोनाची लागण?


गस्तीवर असलेल्या पोलिसाला कोरोनाची लागण?
SHARES
गस्तीवर असलेल्या पोलिसाला कोरोनाची लागण?
देशात कोरोनाचा थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. कालपर्यंत महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्या 64 वरून आज ती 74 वर पोहचली आहे. या कोरोना बाधिक रुग्णांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस शिपायाला ही कोरोनाची लागन झाल्याचे बोलले जाते.


मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी त्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान या ठिकाणी गस्तीवर असणारे रिझर्व्ह फोर्सचे शिपाईला अचानक आज सकाळी खोकल्याचा ञास सुरू झाला. कालांतराने डोके जड होऊलागले. तर खाताना घशात दुखू लागल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. कैलास यांना तपासून डाँक्टरांनी त्यांन् क्सतुरबाच्या वार्ड क्रनांक 27 मध्ये संशयित रुग्ण म्हणून दाखल केल्याचे बोलले जाते. मागील पाच दिवसांपासून त् रुग्णालय परिसरात गस्तीसाठी आले होते. कोरोनाची टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली असल्याचे सांगण्यात आले आहे.


दरम्यान या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंञ्यांनी काल मध्यराञीप्सून मुंबईची लोकल ही सर्व सामान्य प्रवाशांना बंद केली. त्यापूर्वी शाळा, महाविद्यालय, खासगी कंपन्यांना बंद करण्याचे आवाहन केले होते.  या घटना रोखण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांनी कोरोनाची चाचणी करून ज्या रुग्णांना 'होम क्वारंटाइन'चे आदेश दिले आहेत. अशा रुग्णांच्या घरी अनिश्चित भेट देऊन रुग्ण घरी आहे की नाही हे तपासणार आहेत. या पथकात दोन पोलिस उपनिरीक्षक आणि चार काँन्स्टेबलचा समावेश असणार आहे. चार दिवसांपूर्वी एक व्यक्ती दुबईहून भारतात परतली होती. भारतात त्याची करोनाची चाचणी घेण्यात आली होती. चाचणी पॉझिटीव्ह येताच त्याला 'होम क्वारंटाइन' करण्यात आले होते. पण या व्यक्तीने सर्व आदेश तोडले आहेत. या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाला असूनही तो धारावीच्या रस्त्यांवर फिरत होता. पण मुंबई पोलिसांना याबाबत समज देत, त्याला पकडून सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा