Corona virus: रेल्वे पोलिसाला कोरोनाची लागण, 32 जणांची होणार तपासणी


Corona virus: रेल्वे पोलिसाला कोरोनाची लागण, 32 जणांची होणार तपासणी
SHARES
देशात कोरोनाचा थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. कालपर्यंत महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्या 302 वर पोहचली आहे. या कोरोनाचा हा संसर्ग आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांपर्यंत पोहचला आहे.  सीएसएमटी रेल्वे स्थानकावर गस्तीला असलेल्या 51 वर्षीय पोलिस हवालदार यांना कोरोनाची लागन झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या पोलिस शिपायाची कोरोनाची टेस्ट पाँझिटीव्ह आल्याने त्यांच्यासोबत असलेल्या आता 32  पोलिस शिपायांची आता कोरोनाची चाचणी केली जाणार आहे.


मुंबईच्या कायम वर्दीळीचे ठिकाण म्हणून सीएसएमटी स्थानक ओळखले जाते. या स्थानकावरील रेल्वे पोलिस ठाण्यात तो शिपाई   2018 पासून कार्यरत आहेत. तो 15 मार्च ते 22 मार्च पर्यंत कार्यरत होते. अचानक त्यांच्या घशातील खवखव वाढली आणि अशक्त पणा जाणवू लागल्यामुळे ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. आरोग्य तपासणीत त्यांची कोरोनाची टेस्ट पाँझीटिव्ह असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्यांच्या वारंवार  संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यास सुरूवात झाली.


त्या शिपायाची ड्युटी 15 ते 22 मार्च दरम्यान सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या मेन लाईनवर होती. तर 22 ते 27 मार्च दरम्यान ते लाँक अपवर ड्युटीला होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील तब्बल 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे का?  हे आता तपासले जाणार आहे. त्यामुळे रेल्वे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा