कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरणागती पत्करलेल्या 80 पूर्वाश्रमीच्या नक्षलींची वैद्यकीय चाचणी


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरणागती पत्करलेल्या 80 पूर्वाश्रमीच्या नक्षलींची वैद्यकीय चाचणी
SHARES
पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये घडणारी चकमक ही काही नवी नाही, माञ देशावर ओढावलेल्या कोरोना या संसर्ग रोगासमोर आता नक्षलवाद्यांनी ही शस्ञे टाकली आहेत. हिंसेचा मार्ग सोडुन अहिंसेच्या मार्गावर चालण्यासाठी नक्षलवादी संघटनांना कायमस्वरुपी रामराम ठोकणा-या 80 पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांची पोलिसांकडून वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नक्षलवाद विरोधी पथकाने गढचिरोली, धुळे, नंदुरबार या ठिकाणी जाऊन या शरणागती पत्करलेल्या पूर्वाश्रमीच्या नक्षलींची चाचणी केल्याची माहिती वरिष्ठ अधिका-याने दिली.

कोरोना या संसर्ग रोगाचा धोका ओळखूनच काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी आदीवासी बांधवांची ही चाचणी करा, आमच्याकडून कोणिही शस्ञ चालवले जाणार नाही अशी घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमिवर प्रशासनाने गावागावत जाऊन कोरोनाची चाचणी केली. प्रशासनाने त्या ठिकाणी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळेच अनेक नक्षलवाद्यांनी शस्ञ टाकून सरकारसमोर आत्मसमरपण केले होते. शरणागती पत्करलेल्या या पूर्वाश्रमीच्या नक्षलींची नुकतीच वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. त्यात सर्वाचे स्वास्थ उत्तम असल्याचे आढळून आले आहे. तसेच त्यांच्या वेगवेगळ्या व्याधीसाठी औषधोपचार सुरु आहेत. धुळे, नंदुरबार, गढचिरोली जिल्ह्यांत म्हणावे असा कोरोनाचा फैलाव नाही. मात्र 2013पासुन आत्तापर्यंत शरणागती पत्करलेल्या नक्षलींची सर्व जबाबदारी ही सरकारी तसेच पोलीस यंत्रणेची आहे. त्यातच नक्षलवादी संघटनानी एक व्हिडिओ व्हायरल करीत, गढचिरोली, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील आदीवासींना योग्य ते औषधोपचार करण्याचे आवाहन सरकारला केले होते. तसेच त्यासाठी नक्षलवादी संघटनानी शरणागती पत्करीत शस्त्रसंधी केल्याचे देखील आवाहन केले होते. त्याचप्रमाणे, आदीवासींची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी येणा-या आरोग्य पथकाच्या सुरक्षेची देखील जबाबदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

तर दुसरीकडे प्रत्य्ोक जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यात सर्वांची वैद्यकीय चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच नक्षलवाद विरोधी पथकाला शरणागती पत्करलेल्या नक्षलींची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश मिळाले होते. ज्या नक्षलवाद्यानी शरणागती पत्करली आहे, अशा सर्वाना वेगळी ओळख देत त्यांचे पुनर्वसन वेगवगेळ्या ठिकाणी करण्यात आले आहे. त्यानुसार, या पथकाने तीन जिल्ह्यात जाऊन या 80 जणांची वैद्यकीय चाचणी केली. यामध्ये सर्वजण व्यवस्थित असल्याचा अहवाल नक्षलवाद विरोधी विशेष मोहीम विभागाला पाठविण्यात आला आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा