लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत ४ लाख ९० हजार पासचे वाटप

कलम १८८ नुसार १,३१,६२७ गुन्हे नोंद झाले असून २७,१५९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ७ कोटी ९० लाख ३५ हजार ००१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत ४ लाख ९० हजार पासचे वाटप
SHARES

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख ९० हजार ६४७ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ६ लाख १० हजार व्यक्तींना कॉरंटाईन (Quarantine) करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजेच २२ मार्च ते १७ जून  या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,३१,६२७ गुन्हे नोंद झाले असून २७,१५९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ७ कोटी ९० लाख ३५ हजार ००१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

हेही वाचाः- परतणाऱ्या कामगारांची थर्मल तपासणी करा- गृहमंत्र्यांचे आदेश

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत असताना. पोलिस नागरिकांच्या सुरक्षेसाठी आजही रस्त्यावर उतरून त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. मात्र तरी ही पोलिसांच्या आवाहनांना न जुमानता काही टवाळखोर नियमांचे उल्लघंन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा टवाळखोरांविरोधात पोलिसांनी कडक पाऊले उचलली आहे. या दरम्यान काही ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर ही हल्ला होण्याच्या २६८ घटना घडल्या. त्यात ८५१ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. तर नागरिकांना तातडीने मदत मिळावी. यासाठी पोलिसांनी त्यांच्या १०० नंबरवरील सेवा ही २४ तास कार्यरत ठेवलेली आहे. पोलिसांना आतापर्यंत मदतीसाठी ३ हजार फोन आलेले आहेत. तर   पोलीस विभागाच्या  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. त्यावर  लॉकडाऊनच्या काळात १,०३,७०७फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

हेही वाचाः- भारतातील पहिल्या मोबाईल लॅबचं उद्घाटन, होणार अधिक चाचण्या

तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ७३४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ६,१०,२८१ व्यक्ती Quarantine  आहेत. अशी माहिती. देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८३,०६१ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील २९ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३०, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१, पालघर १ अशा ४५ पोलिस बांधवांना  वीरगती प्राप्त झाली. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १२२ पोलीस अधिकारी व ८९९ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यात सध्या एकूण १२२ रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ४,१३८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा