परतणाऱ्या कामगारांची थर्मल तपासणी करा- गृहमंत्र्यांचे आदेश

. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड सह राज्याच्या इतर भागातही दररोज जवळपास साडे पंधरा हजार कामगार येत आहेत.

परतणाऱ्या कामगारांची थर्मल तपासणी करा- गृहमंत्र्यांचे आदेश
SHARES

लॉकडाउनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळू हळू सुरू झाले आहेत. यासाठी परप्रांतीय कामगार राज्यात परत येत आहेत. त्या सर्व कामगारांची योग्य नोंद थर्मल तपासणी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे रेल्वे, विमानतळ आणि मुंबईच्या टोल नाक्यांवर पोलिस आता राज्यात पून्हा येणाऱ्या कामगारांची नोंद ठेवणार आहेत.

लाँकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार वर्ग हा आपआपल्या राज्यात परत गेला होता. तो आता महाराष्ट्रात मोठ्या संख्येने वापस येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड सह राज्याच्या इतर भागातही दररोज जवळपास साडे पंधरा हजार कामगार येत आहेत.  यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या सर्व कामगारांची यादी संबंधित राज्यांकडून आपल्याकडे पाठवण्यात येते. त्या यादीनुसार आलेल्या सर्व कामगारांची नोंद, तसेच त्यांची थर्मल तपासणी करण्यात येते व त्यानंतर त्यांच्या हातावर होम काँरंटाईन शिक्का मारून त्यांना राहण्याच्या ठिकाणी होम काँरंटाईन Home Quarantine  साठी पाठवण्यात येते. मुंबई मध्ये बेस्ट मार्फत पाठवण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

 राज्यातील गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर, पुणे या ठिकाणी सध्या साधारणतः ४ ते ५ हजार तर मुंबई ठाणे नवी मुंबई भागात ११ ते ११.५० हजार परप्रांतीय कामगार दररोज येत आहेत. सध्या मर्यादित रेल्वे सुरू असल्याने ही संख्या कमी आहे, पण आपल्याकडील उद्योगधंदे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर या संख्येत निश्चितच वाढ होईल. त्यावेळी देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा