मुंबई पोलिसांच्या सुरक्षेसाठी 'सॅनिटायझेशन व्हॅन'


मुंबई पोलिसांच्या सुरक्षेसाठी 'सॅनिटायझेशन व्हॅन'
SHARES

जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. यात महत्वाची जबाबदारी पोलीस प्रशासन पार पाडत असून 24 तास रस्त्यावर खडा पहारा दिला जात आहे. सामान्य माणसाप्रमाणे त्यांना देखील करोनाचा धोका आहेच.  या पार्श्वभूमीवर पुण्यानंतर सॅनिटायझेशन व्हॅन मुंबई पोलिसांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. गुरूवारी या व्हँनची पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी पाहणी केली.


पुण्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत, स्थानिक पोलिस ही  स्वत:चा जिव धोक्यात घालून , ड्युटी करत असल्यामुळे त्यांना या संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तांनी 'संजीवनी व्हँन'ची संकल्पना अंमलात आणली. करोना व्हायरस या आजारामुळे देशात लॉकडाउन आहे. या दरम्यान पोलीस अधिकारी आणि कर्मचारी 24 तास कामावर आहेत. त्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागात तैनात असणार्‍या कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल मिस्टींग सॅनिटायझर वाहन तयार करण्यात आले आहे. या वाहनात एखादा कर्मचारी साधारण 10 सेकंद थांबल्यास निर्जंतुकीकरण होण्यास मदत होणार आहे. या सर्वाचा परिणाम काही तास राहणार आहे. 


मुंबईतल्या ज्या महत्वाच्या परिमंडळात कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. त्या 5 परिमंडळांना पहिल्या टप्यात या 5 संजीवनी व्हँन दिल्या जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित परिमंडळांना गरजेनुसार ही व्हँन पुरवली जाणार आहे. मुंबईत सध्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. या आधी मुंबई पोलिसांना गृहमंञी अनिल देशमुख यांनी कोरोनापासून बचावासाठी मास्क, ग्लोज आणि इतर साहित्याचे वाटप केले होते.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा