अफवा पसरवल्याप्रकरणी ४६१ गुन्हे दाखल, पहा तुमच्या जिल्ह्यातील गुन्ह्यांची नोंद

आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९२ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत

अफवा पसरवल्याप्रकरणी ४६१  गुन्हे दाखल, पहा तुमच्या जिल्ह्यातील गुन्ह्यांची नोंद
SHARES
लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४६१  गुन्हे दाखल झाले असून २५० व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४६१ गुन्ह्यांची (ज्यापैकी २८ N.C आहेत) नोंद ०६ जून २०२० पर्यंत झाली आहे.
 
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९२ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २५०आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.
            

चुकीचा मेसेज पासून सावधान
 महाराष्ट्र सायबर असे देखील नमूद करू इच्छिते की जर आपणास कोणी अपरिचित व्यक्तीने किंवा आपण ज्या व्हाट्सअँप ग्रुप्सवर आहात त्यावर कोणी परिचित किंवा कोणी अपरिचित व्यक्तीने असे विडिओ, फोटोज, मेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स ज्यामुळे धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण होऊ शकते, असे मेसेज पाठवत असेल , तर लगेच त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये द्यावी .तसेच आपण असे विडिओ, फोटोज ,मेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स कोणालाही पाठवू नयेत व त्वरित delete करावेत . तुम्ही जर कोणत्या व्हाट्सअँप ग्रुपचे  ऍडमिन असाल तर चुकीच्या पोस्ट्स अथवा अफवा पसरवणारे मेसेजेस व विडिओ ग्रुपवर येणार नाहीत याची खबरदारी घेणे तुमचे कर्तव्य आहे व तसे न केल्यास तुमच्यावर पण गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा