मुंबईतील 472 पोलिसांची कोरोनावर मात

मुंबई पोलिस दलातील 214 अधिकारी व 1176 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सुखद बाब म्हणून त्यातील 472 पोलिस कोरोनामुक्त होऊन झाले आहेत.

मुंबईतील 472 पोलिसांची कोरोनावर मात
SHARES
आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झालेल्या मुंबई पोलिस दलातील 472 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. त्यातील बहुसंख्य पोलिस कामावर रुजू झाल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

मुंबई पोलिस दलातील 214 अधिकारी व 1176 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सुखद बाब म्हणून त्यातील 472 पोलिस कोरोनामुक्त होऊन झाले आहेत. त्यातील बहुसंख्य पोलिस पुन्हा सेवेत रुजू झाले आहे. याशिवाय मुंबईतील राज्य राखीव पोलिस दलाच्या 70 जवानांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यात पाच अधिका-यांचा समावेश आहे.

सध्या एक हजार 421 पोलिसांवर राज्यातील विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालयात  तसेच इतर ठिकाणी उपचार सुरु आहेत.तर सुमारे सात हजार पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनामुळे आतापयर्यंत 26 पोलिसांना आपले जीव गमवावे लागले आहे. मुंबईतही 13 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात पोलिसांच्या मदतीला केंद्रीय पथके दाखल करण्यात आली आहेत. मात्र या पथकातील जवान देखील कोरोनाच्या कचाट्यातुन सुटले नाहीत. आतापर्यंत 22 जवानाना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

राज्यातील दोन हजारांहून अधिक पोलिसांना कोरोना झाला आहे. तसेच संशयीत रुग्णाच्या संपर्कात आलेले सात हजार पोलिस विलगीकरणात आहेत. याशिवाय 55 वर्षावरील पोलिसांना सुटीवर पाठवण्यात आले आहे. तसेच 50 वयोगटावरील पोलिसांना कमी जोखीमीचे काम देण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी सध्या 10 हजार होमगार्ड, 1200 केंद्रीय सुरक्षा जवान देण्यात आले आहेत.
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा