अवैध दारू विक्रीप्रकरणी राज्यभरात 4635 गुन्ह्यांची नोंद, तर इतक्या कोटीचा माल जप्त...

अवघ्या दोन दिवसात 62 कोटी 55 लाखांची दारूविक्री झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले

अवैध दारू विक्रीप्रकरणी राज्यभरात 4635 गुन्ह्यांची नोंद, तर इतक्या कोटीचा माल जप्त...
SHARES

राज्यसरकारने दारूविक्रीला परवानगी देताच अवघ्या दोन दिवसात 62 कोटी 55 लाखांची दारूविक्री झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे. माञ दारू बंदी असताना अवैध रित्या दारूची तस्करी करण्यात आलेल्या कारवाईचा आकडा ही तसा मोठाच आहे. लाँकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजेच 24 मार्च ते 4 मे पर्यंत राज्यभरात 4635 गुन्हे नोंदवण्यात आले असून आतापर्यंत 1999 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईतून राज्य उत्पादन शुल्क विभागाने 12.23 कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


लाँकडाऊममुळे राज्यभरात अत्यावश सेवा देणारी दुकाने वगळता सर्वच दुकानांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तळीरामांची चांगलीच पंचायत झाली होती. तरी ही बाजारात काळ्याबाजाराने काही जण दारूची तस्करी करत होते. माञ ती या तळीरामांच्या खिशाला न परवडणारीच, एका दारूच्या बाटलीसाठी तब्बल अडीच हजार रुपये काळ्याबाजारात स्विकारले जात होते. माञ तरी ही काहा हौशी मिळेल त्या भावात दारूची पोलिसांच्या पाठीमागे दारू खरेदी करायचे. अशा दारूच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी लक्ष ठेवून असायचे. 24 मार्च ते 4 मे या लाँकडाऊनच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूची अवैध तस्करी करणाऱ्यांविरोधात एकूण 4635 गुन्हे नोंदवले. त्यात आतापर्यंत 1999 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईतून राज्य उत्पादन शुल्क विभागाने 12.23 कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर अवैध दारू तस्करीसाठी वापरण्यात आलेली 398 वाहने आतापर्यंत जप्त केली आहेत.

शेजारील राज्यांमधून महाराष्ट्रात होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी विभाग 24 तास कार्यरत आहे. त्यानुसार नाकाबंदी केली असून गोवा, दादरा- नगर हवेली, दीव- दमण, कर्नाटक व मध्यप्रदेश राज्यातून अवैध मद्य येणार नाही याकरिता 12 कायमस्वरूपी आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी तपासणी करीत आहेत. तसेच 18 तात्पुरते सीमा तपासणी नाके देखील उभारण्यात आले आहेत.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24×7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. त्यासाठी टोल फ्री क्रमांक  18008333333 व्हाट्सअँप क्रमांक 8422001133.

ई-मेलcommstateexcise@gmail.com असा आहे. करिता सदर नमूद क्रमांकावर अवैध मध्ये विरुद्ध तक्रार नोंदविण्यात यावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात येत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा