दहशतवाद विरोधी पथकातील 'त्या' पोलिस कर्मचाऱ्याचा ही कोरोनानेच मृत्यू


दहशतवाद विरोधी पथकातील 'त्या' पोलिस कर्मचाऱ्याचा ही कोरोनानेच मृत्यू
SHARES

मुंबईच्या नागपाडा येथे असलेल्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातील पोलिस शिपायाचा दोन दिवसांपूर्वी ताप येऊन मृत्यू झाला होता. त्याच्या कोरोनाचा वैद्यकिय अहवाल प्रतिक्षेत होता. मंगळवारी त्याच्या वैद्यकिय अहवालात त्याला कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. महाराष्ट्र पोलिस दलात कोरोनाने आतापर्यंत 14 पोलिस कर्मचाऱ्यांचे बळी घेतले असून कोरोना बाधित पोलिसांची संख्या 1388 वर पोहचली आहे.

मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकात मृत पोलिस कर्मचारी कार्यरत होते. मे च्या दुसऱ्या आठवड्यात त्यांना ताप आला, वैद्यकिय तपासणीत त्यांना टॉयफॉईड झाल्याचे डाँक्टरांनी सांगितले होते. 11 मेपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच काल 17 मे रोजी अचानक त्यांना श्वास घ्यायला ञास होऊ लागला. त्यावेळी त्यांना उपचारासाठी आधी भाटीया मग नायर रुग्णालयात हलवण्यात आले. माञ उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेहाचा ञास होता. त्यामुळे त्यांची मरणोत्तर ‘कोरोना’ तपासणी करण्यात आली होती. त्यांचा रिपोर्ट येणं बाकी होतं. मंगळवारी त्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे त्यात म्हटलं होतं. मुंबईत कोरोनामुळे 9 पोलीस कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत.

दरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक पोलिसांना कोरोनाची लागन झाली असताना. त्यांना वैद्यकिय उपचाराकरता रुग्णालयात पोहचवण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या असंख्य तक्रारी येत असल्याने पोलिस सह आयुक्त नवल बजाज यांनी पालिका आयुक्तांना पञ लिहून नाराजी व्यक्त करत, पोलिसांना सहकार्य करण्याबाबत पञ लिहिले आहे. त्यात राज्यातील 1328 पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 618 पोलिस म्हणजेच  निम्मे पोलिस हे मुंबई पोलिस दलातील आहे. तर आतापर्यंत 8 पोलिस कर्मचाऱ्यांचा या संसर्गजन्य विषाणूने मृत्यू झालेला आहे. पोलिस दलात ही कोरोनाने बाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असताना. त्यांना रुग्णालयात उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यासाठी पालिकेच्या रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. 7 ते 8 तासाच्या प्रतिक्षेनंतर  पोलिसांना रुग्णवाहिका उपलब्ध होत आहे. पालिकेच्या हेल्पलाइनवर संपर्क करून ही वेळेत कोरोना बाधित पोलिस रुग्णंासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्याचे परिणाम पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर होत असल्याचे पञात म्हटले आहे.


त्यामुळे पालिकेने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकांपैकी 12 रुग्णवाहिका पोलिसांच्या 13 परिमंडळाकरिता प्रत्येकी 1 रुग्णवाहिका ही पोलिसांसाठी उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी नवल बजाज यांनी पालिका आयुक्त पञ लिहून कळवली आहे. पोलिसांना वेळीच वैद्यकिय उपचार मिळण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तालयात मुंबई पोलिस कोविड 19 कक्षची स्थापना करण्यात आली असून पालिकेशी समन्वय साधण्यासाठी पोलिस विभागातर्फे विशेष हेल्पलाइन सुरू आहे. 


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा