महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी ई-पास हवाय, तर नक्की वाचा...


महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी ई-पास हवाय, तर नक्की वाचा...
SHARES
कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देश ठप्प झाला आहे. महाराष्ट्रासह मुंबईत या संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच प्रवासी वाहतूक  बंद असल्यामुळे अनेकांनी चालतच आपल्या मूळ गावी जाण्याचा रस्ता धरला. त्यातच पंतप्रधान मोदींनी लाँकडाऊन वाढवला असला. तरी राज्यसरकारने आता मजूर, विविध राज्यात अडकलेले किंवा महाराष्ट्रात अत्यावश्यक प्रवास करण्यासाठी ई-पास व्यवस्था सुरू केली आहे.


सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून ई-पास दिला जात आहे. दरम्यान पोलिसांननी यासाठी एक नियमावली तयार केली आहे. त्या नियमावलीत आपात्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर प्रवास करण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या या  http://covid19.mhpolice.in साईटवर  E-Pass साठी अर्ज करायचा आहे.

पास केवळ अत्यंत आपात्कालीन परिस्थितीतच देण्यात येईल.

1) http://covid19.mhpolice.in वर जा.

2) संकेतस्थाळावर गेल्यानंतर तुम्हाला Apply for Pass Here पर्याय दिसेल

3)तिथे सर्व तपशील योग्य पद्धतीनं भरा आणि संबंधित कागदपत्रे जोडा.

4) सर्व माहिती दिल्यानंतर  Submit वर क्लिक करा. प्राप्त झालेला Token ID सेव्ह करुन ठेवा. 

5) http://covid19.mhpolice.in वर आपण पासची स्थिती तपासू शकता आणि पास मंजूर झाल्यावर तो डाऊनलोड करु शकता. 

हा फॉर्म केवळ इंग्रजी भाषेतच भरावा लागणार आहे.  सर्व कागदपत्रांची एकच फाईल तयार करावी लागेल. तुमचा ई पास मिळाल्यानंतर त्याची हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी तुमच्याजवळ प्रवास करताना ठेवा.

पाससाठी एकापेक्षा अधिक वेळा अर्ज करु नका. तुम्हाला मिळालेला Token ID सेव्हा करायला विसरु नका. तसंच अधिकृततेशिवाय वैधतेपलिकडं हा पास वापरू नका, असं पोलिसांनी आपल्या नियमावलीमध्ये म्हटलं आहे.

ऑफलाईन ई पास मिळवण्याची प्रक्रिया

1) ऑफलाईन ई पास मिळवण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तु्म्हाला अर्ज करावा लागेल.

2) सध्या राहत असलेला पत्ता, जाण्याच्या ठिकाणाचा पत्ता, किती लोक जाणार, त्या प्रत्येकाची नावं, मोबाईल नंबर, पत्ता, पॅनकार्ड किंवा आधारकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्रं, कोणत्या वाहनाने जाणार त्याची माहिती त्या अर्जात भरावी लागणार आहे

3) यात बसची व्यवस्था स्वत:च करायची आहे. तसेच बसमधून केवळ 22 लोकांनाच जाता येणार आहे. बससाठी पैसे जमा करूनही बसची व्यवस्था झाली नाही तर पोलिसच स्वत: बसची व्यवस्था करून देताहेत. 

या संपूर्ण प्रक्रियेतून पार पडल्यानंतरच पोलिसांकडून ई-पास दिला जातो. त्याशिवाय ई-पास दिला जात नाही. शिवाय कंटेन्मेंट झोनमधील लोकांना ई-पास दिला जात नाही. तसंच कंटेन्मेंट झोनमधील नसलेल्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे, जर तो परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये असेल तर पास मिळत नाही. शिवाय ज्या गावाला जाणार आहात, त्या गावच्या प्रमुखाची एनओसीही आवश्यक आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा