डिलिव्हरी बॉय मुस्लिम, रहिवाश्यानं नाकारलं सामान

सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी आलेला मुलगा मुस्लिम असल्यामुळे एका रहिवाश्यानं सामान घेण्यास नकार दिल्यानं पोलिसांनी केली कारवाई...

डिलिव्हरी बॉय मुस्लिम, रहिवाश्यानं नाकारलं सामान
SHARES

देशभरात सध्या लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात लोकांना अत्यावश्यक वस्तू घरापर्यंत पोहचवल्या जात आहेत. जीवाची पर्वा न करता लॉकडाऊनच्या काळात आजही डिलव्हरी बॉय सामान पोहचवत आहेत. मात्र या सगळ्यात मीरा रोडमध्ये संतापजनक प्रकार घडला आहे. सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी आलेला मुलगा मुस्लिम असल्यामुळे एक रहिवाश्यानं सामना घेण्यास नकार दिला.


‘त्या’ इसमास अटक

याप्रकरणी मीरा रोड इथला रहिवासी असलेल्या या इसमाला बुधवारी त्याच्या सृष्टी कॉम्प्लेक्समधील राहत्या घरातून अटक करण्यात आली. त्याला ठाणे सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

एका वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकार मंगळवारी (21 एप्रिल) रोजी घडला. ३२ वर्षीय मुस्लिम मुलानं ऑनलाईन मागवलेल्या सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी सृष्टी कॉम्प्लेक्समध्ये गेला. मास्क आणि गोल्व्ह्जचा वापर केला असतानाही, त्या व्यक्तीनं डिलिव्हरी बॉयकडून सामान घेण्यास नकार दिला.

सामान घरपोच पोहचवण्यासाठी सदर इसमाच्या बिल्डिंग खाली हा मुलगा गेला होता. सदर इसम आपल्या पत्नीसोबत सामान घेण्यासाठी आला होता. यावेळी पत्नी सामानाची यादी पाहत असताना पतीनं डिलिव्हरी बॉयला त्याचं नाव विचारलं. मात्र नाव ऐकल्यानंतर हा मुलगा मुस्लिम असल्याचे कळल्यानंतर त्यांने सामान घेण्यास नकार दिला. दरम्यान डिलिव्हरी बॉय आणि सदर इसमामध्ये बाचाबाचीही झाली. डिलिव्हरी बॉयनं सर्व संवाद आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला.

काय म्हणाला डिलिव्हरी बॉय?

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना डिलिव्हरी बॉय म्हणाला की, "जीवाची पर्वा न करता मी लोकांना घरपोच किराणा देत आहे. मात्र अशा कठिण काळातही लोकांना धर्माचा विचार करायचा आहे, हे खूप भयंकर आणि दु:खद आहे".

पोलिसात तक्रार

डिलिव्हरी बॉयनं हा प्रसंग आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. डिलिव्हरी बॉयच्या घरच्यांनी याबाबत सांगितलं की, "लोकांना घरपोच सामान मिळावं म्हणून या मुलगा दिवस-रात्र काम करतो. आम्हाला सतत त्याची चिंता असते. त्यानं आतापर्यंत अनेक घरांमध्ये सामान पोहचवलं आहे, पण असा दुजाभाव कधी मिळाला नाही". दरम्यान पोलिसांनी सदर इसमावर कलम 295 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.



हेही वाचा

अर्णब गोस्वामी यांच्यावर हल्ला, काँग्रेसवर केले गंभीर आरोप

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा