अर्णब गोस्वामी यांच्यावर हल्ला, काँग्रेसवर केले गंभीर आरोप

रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या बायकोवर हल्ला करण्यात आला आहे.

अर्णब गोस्वामी यांच्यावर हल्ला, काँग्रेसवर केले गंभीर आरोप
SHARES

रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे (Republic Media Network) मुख्य संपादक अर्णब गोस्वामी ( #ArnabGoswami) यांच्यावर हल्ला करण्यात आला. बुधवारी रात्री मुंबईतील रिपब्लिकच्या स्टुडिओवरून ते घरी जात असताना त्यांच्यावर हल्ला (Attacked) करण्यात आला. या हल्ल्याची माहिती अर्णव गोस्वामी यांनी ट्विटरवर दिली.


कुठे झाला हल्ला?

अर्णबच्या घरापासून जवळच ५०० मीटर अंतरावर हा हल्ला करण्यात आला. दोन गुंड (Goons) त्यांचा पाठलाग करत होते. ते आणि त्याची पत्नी टोयोटा कारमधून घराच्या दिशेनं जात होते. त्यावेळी मुखवटा लावलेल्या गुंडांनी अर्णबच्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि बाईक कारच्या पुढे थांबवली. त्या गुंडांनी बाईक थांबवताच अर्णब यांना वाटलं की त्यांची बाईक बिघडली असावी. पण ते दोन गुंड बाईकवरून उतरले आणि अर्णब जिथे बसले होते त्या कारच्या विंडोजवळ गेले. विंडो तोडण्याचा प्रयत्न करू लागले. विंडो तुटत नाही हे पाहून  त्यांच्या गाडीवर शाईनं भरलेल्या बाटल्या फेकण्यात आल्या. याशिवाय त्यांना शिवीगाळ देखील करण्यात आला, अशी माहिती अर्णब यांनी ट्विटरवर दिली आहे. 

अर्णबच्या सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोरांना पकडलं आहे. त्यांना एन. एम. जोशी (N.M.Joshi Police) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. एन एम जोशी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 


सोनिया गांधींवर आरोप

अर्णब यांनी ट्विटरवर घडलेल्या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी काँग्रेस (congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि वाधवा कुटुंबियांवर आरोप केले आहेत. त्यांनी हल्ला केल्याचा आरोप अर्णब यांनी केला आहे. "माझ्या शोमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना काही प्रश्न केले होते. तेच प्रश्न खटकले आणि माझ्यावर हल्ला केला गेला," असा आरोप अर्णब यांनी केला आहे. यासंदर्भात ते तक्रार करणार असंही अर्णब यांनी ट्वीटरवर दिलेल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केलं आहे.

ट्विटरवर ट्रेंड

अर्णब गोस्वामी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ट्विटरवर आय सपोर्ट अर्णब गोस्वामी (#ISupportArnavGoswami), अर्णब गोस्वामी (#ArnabGoswami ), सोनीया गांधी अटॅक अर्णब (#soniagoonsattackarna), अर्णब एक्सपोज सोनीया (#ArnabExposesSonia), असे ट्रेंड (Twitter Trend) सुरू झाले आहेत. अनेक युजर्सनी अर्णब यांना पाठिंबा देत ट्विट केले आहेत. 

 

दरम्यान अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी काँग्रसे तर्फे करण्यात आली आहे. हेही वाचा

भिवंडीत अल्पवयीन मुलीवर घरात घुसून हल्ला, एकतर्फी प्रेमातून घटना

लाॅकडाऊनच्या काळात पोलिसांवरील हल्ल्याच्या ११७ घटना

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा