Advertisement

ऑनलाईन दारू विक्रीच्या नावाखाली फसवणुकीचा नवा फंडा, 73 फोन नंबर पोलिसांनी टाकले ब्लॅक लिस्टमध्ये

यातील बहुतांश नंबर हे पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, ओडिसा, हरियाना या राज्यातले आहेत.

ऑनलाईन दारू विक्रीच्या नावाखाली फसवणुकीचा नवा फंडा, 73 फोन नंबर पोलिसांनी टाकले ब्लॅक लिस्टमध्ये
SHARES
Advertisement

लॉकडाऊनमध्ये दारुविक्री बंद असल्याने दारु शौकीन आणि तळीरामांची तडफड सुरु होती. माञ दारूविक्रीला परवानगी देताच, वाईन शाँप वाल्यांनी घरपोच डिलेव्हरी देण्यास सुरूवात केल्याने  नागरिक ऑनलाईन पद्धतीने दारुची ऑर्डर देऊन घरीच दारु पिण्याचा बेत आखतात. मात्र ऑनलाईन पद्धतीने दारु मागवणे तुम्हाला महागात पडू शकते.ऑनलाईन दारुविक्रीच्या नावाखाली फसवणुकीचा नवा फंडा भामट्यांनी सुरु केला आहे. अशा भामट्यांचे 73 फोननंबर पोलिसांनी जाहिर केले असून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

लॉकडाऊनमध्ये दारुचं व्यसन असलेल्या तळीरामांची मोठ्या प्रमाणात तडफड सुरु होती. काही जणांची तर दुकानं फोडण्यापर्यंत मजल गेली होती. कालांतराने शासनाने दारूची मुंबईत घरपोच सेवा सुरू केली. त्याचाच फायदा भामट्यांनी घेत फसवणूक करण्यास सुरूवात केली. या चोरांनी इंटरनेटचा गैर वापर करुन ऑनलाईन पद्धतीने मिळणाऱ्या दारुच्या दुकानाची माहिती काढून त्या दुकानाच्या संपर्क क्रमांकाजागी स्वत:चा नंंबर नोंदवला. त्यामुळे ज्या ग्राहकाला ऑनलाईन दारु हवी असल्यास ते सोशल मिडियावरील वाईन शाँपच्या नंबरवर फोन करतात आणि अलगत या चोरांच्या जाळ्यात सापडतात. नशेत किंवा विश्वास ठेवून ग्राहक पैसे भरण्याच्या उद्देशाने त्या चोरट्यांना डेबीट किंवा क्रेडिट कार्डची माहिती देतात. त्यानंतर काही तासात ग्राहकांचे पैसे चोरीला जातात.  मुंबईत सध्या अशा फसवणूकींच्या तक्रारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांकडे नोंदवण्यात आलेल्या तक्रारीत वारंवार फसवणूकीकरता वापरण्यात आलेले 73 नंबर सायबर पोलिसांनी शोधले आहे. यातील बहुतांश नंबर हे पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, ओडिसा, हरियाना या राज्यातले आहेत.

  नुकताच असा प्रकार अंधेरीत राहणाऱ्या एका तरुणासोबत घडला.  तक्रारदार हा एका मोबाईल सर्व्हिस स्टोअर्समध्ये अधिकारी आहे. या व्यक्तीने वाईन घरपोच करणाऱ्या दुकानांचा इंटरनेटवर शोध घेतला. त्याला अंधेरीतील एका वाईन शॉपचा दूरध्वनी क्रमांक आढळला. त्याने दूरध्वनी करून वाईन मागवली व "कॅश ऑन डिलिव्हरी' पर्याय निवडला. परंतु, या पद्धतीने पैसे स्वीकारणे बंद केल्याचे त्याला सांगून क्रेडिट कार्डची माहिती व ओटीपी असा तपशील घेण्यात आला. यापूर्वीही तेथून वाईन मागवल्यामुळे शंका आली नाही, ओटीपी शेअर करताच तक्रारदाराच्या मोबाइलवर एका मागोमाग एक पैसे काढण्यात आल्याचे मेसेज येऊ लागले.

 अशा घटनांना सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात घडत आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा वांद्रे पोलिसांनी पर्दाफाश केला होता.त्यावेळी हे गुन्हे रोखण्यासाठी पश्चिम उपनगरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातून एक अधिकारी निवडत विशेष पथक नेमत अशा फसवणूकीच्या गुन्ह्यांवर लक्ष ठेवून होते. यातूनच त्यांची मेहनत कामी आली. पोलिसांनी राजस्थानहून एकाला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकार थांबवण्यासाठी स्वत:च आँनलाईन दारू विक्रीसाठी दिसणाऱ्या बोगस वाईन शाँपच्या नंबर खाली खासगीतून प्रतिक्रिया देत, या साईटहून मद्यविक्री न करण्याचे आवाहन केले होते.

सध्या फसवणूक करणारे हे सर्व नंबर सायबर पोलिसांच्या रडारवर असून ग्राहकांनी लिकर विक्रेते गुगल किंवा पेटीएम प्रमाणे इतर आँनलाईने पेमेंट स्विकारत नाही आहेत. तसेच दारूची घरपोच डिलेव्हरी झाल्यानंतरच पैसे स्विकारले जात आहेत. डिलिव्हरीनंतर फक्त क्रेडिटकार्ड मशीनद्वारे पैसे स्विकारले जात आहे. त्यामुळे अशा भामट्यांपासून सतर्क आणि सावध राहण्याचे. आवाहन  मद्यविक्री करणारे विक्रेत्यांच्या असोसिएशन आणि सायबर पोलिस ठाण्याचे विशाल ठाकूर यांनी केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement