कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यांविरोधात ४५३ गुन्हे, २३९ जणांना अटक

आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १८८ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यांविरोधात ४५३ गुन्हे, २३९ जणांना अटक
SHARES
लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४५३  गुन्हे दाखल झाले असून २३९ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

 महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४५३ गुन्ह्यांची (ज्यापैकी २७ N.C आहेत) नोंद १जून २०२० पर्यंत झाली आहे. 
महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४५३ गुन्ह्यांची (ज्यापैकी २७ N.C आहेत) नोंद ०१ जून २०२० पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १८८ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २३९ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.
 


हरवलेल्या फोन बाबत ई-मेल-सावधान
  
सध्या लॉकडाउनच्या काळात सायबर भामटे हे नागरिकांना फसविण्यासाठी विविध क्लुप्त्यांचा वापर करत आहेत . आपल्याकडे बरेच नागकरिक स्वतःचा मोबाईल फोन हरविला कि त्याची तक्रार नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करतात व त्याचा तपास नाही लागल्यास, परत नवीन मोबाईल विकत घेऊन, आपल्या रोजच्या आयुष्यात व्यस्त होतात . याच गोष्टीचा फायदा घेऊन सायबर भामटे पोलीसांच्या नावाने एक ई-मेल पाठवत आहेत . सदर ई-मेल मध्ये नमूद असते कि 'तुमचा हरविलेला मोबाईल सापडला आहे .त्याचा  परत मिळण्याचे ठराविक खर्च आहे तो तुम्ही केलात कि तुम्हाला तुमचा मोबाईल परत मिळेल. लॉकडाउनच्या काळात आम्ही प्रत्यक्ष येऊ शकत नाही, त्यामुळे ई-मेलमध्ये नमूद केलेल्या बँक खात्यात paytm ,google pay किंवा अन्य माध्यमांद्वारे आपण ठराविक रक्कम जमा करावी.


 कृपया असल्या ई-मेल किंवा मेसेजला बळी पडून  कोणत्याही प्रकारची रक्कम ,खात्यात भरू नका . सदर ई-मेल खरा आहे का खोटा याची आधी तपासणी करा . हि तपासणी सोप्या पद्धतीने देखील करता येते ,जर तुम्ही gmail चा वापर करत असाल तर असे मेसेज आल्यावर व तो ओपन केल्यावर reply च्या बाजूला ३ उभे ठिपके दिसतील त्यावर क्लिक करा व त्यातील show original option क्लिक करा ,त्यामुळे सदर ई-मेलचा इंटरनेटवरचा  सर्व प्रवास समजू शकतो .
लक्षात ठेवा जर एखाद्या ई-मेलवर अशा प्रकारचा मेसेज दिसला तर शक्यतो तसा ई-मेल न उघडताच डिलिट करा .
असे ई-मेल आल्यास खालील मुद्द्यांच्या आधारे त्या ई-मेलची सत्यता पडताळण्यास उपयोग होईल :

१) कोणतेही पोलीस अधिकारी कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या पैश्यांची मागणी ,चोरीच्या सापडलेल्या वस्तू परत करण्यासाठी करणार नाहीत.
२)जर असा ई-मेल  आल्यास तुम्ही ज्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे ,तिथे संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून किंवा प्रत्यक्षपणे भेटून ई-मेल मधील मजकुराची सत्यता पडताळून बघा .
३)अधिकृत ई-मेल वरून येणारे इमेल्स हे तुमच्या इनबॉक्समध्ये येतात spam मध्ये नाही .
त्यामुळेअसे ई-मेल आल्यास घाबरून  जाऊ नका व त्याची तक्रार www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर नोंदवा , तसेच कोणत्याही परिस्थती मध्ये अशा ई-मेलमध्ये नमूद खात्यामध्ये पैसे transfer करू नका. आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा