वाकोला पोलिस ठाण्यातील 6 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना


वाकोला पोलिस ठाण्यातील 6 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना
SHARES
मुंबईत नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिस विभागाला कोरोनाने लत्ष केलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्र पोलिस दलातील  21 अधिकारी आणि 155 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून 3 पोलिस कर्मचाऱ्यांचा या महामारीने बळी घेतला आहे. त्यात मुंबईच्या वाकोला पोलिस ठाण्यातील 6 जणांना आता कोरोनाची लागन झाल्याचे वृत्त समोर येत असल्याने पोलिस दलात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचे चिञ आहे.


  बुधवारी वाकोला पोलीस ठाण्यातील सहा अंमलदारांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या आठवडय़ात या पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस ठाण्यातील बहतांश सर्वच पोलीस अधिकारी, अंमलदारांची चाचणी करण्यात आली. चाचणी अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यात दोन महिला शिपायांसह सहा अंमलदारांना करोनाची लागण झाल्याचे निदान होते. त्यामुळे या सहाजणांच्या संपर्कात आलेल्या किमान 50 ते 60 व्यक्तींना विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांची निवासस्थाने आणि आसपासचा परिसर प्रतिबंधीत करण्यात आला. त्याचप्रमाणे आग्रीपाडा पोलीस ठाणे, ताडदेव पोलीस वसाहत, नायगाव मुख्यालय परिसरातील पोलीस करोनाबाधीत आढळल्याचे सांगण्यात आले. रविवारी राज्य पोलीस दलातील शंभरहून अधिक अधिकारी, कर्मचारी बाधीत होते. त्यातील निम्मे बाधीत मुंबई पोलीस दलातील होते.

मुख्यालयाच्या सूचनेने पोलिसांत संभ्रम

मुंबई पोलीस आयुक्तांनी 55 वर्षांवरील सर्व आणि 52 वर्षांवरील आजारी पोलिसांना कामावर न येण्याच्या सूचना जारी करून काही तास होत नाहीत तोच मुख्यालयाने वेगळीच सूचना काढल्याने पोलीस गोंधळले. मुख्यालयाने काढलेल्या सूचनेनुसार 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या अधिकारी, अंमलदारांना करोनाची लागण होण्याचा जास्त धोका आहे. तो लक्षात घेता 55 वर्षांवरील सर्वच अधिकारी, अंमलदारांना पोलीस ठाण्यांतर्गत कर्तव्य द्यावे. 50 ते 55 वयोगटातल्या अधिकारी, अंमलदारांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, रक्तवाहिन्यांशी निगडित विकार असेल त्यांनाही पोलीस ठाण्याबाहेरील किं वा जनतेच्या संपर्कात येतील, अशा ठिकाणी कर्तव्य देऊ नये. बुधवारी ही सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी मुख्यालयातर्फे ही सूचना राज्यभर जारी के ली. त्यामुळे आयुक्तालयाने सुटीवर पाठवले आणि मुख्यालय कामावर बोलावते, असा संभ्रम निर्माण झाला.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा