'या' जिल्ह्यात मध्यविक्रीसाठी आता ई-टोकन सेवा सुरू


'या' जिल्ह्यात मध्यविक्रीसाठी आता ई-टोकन सेवा सुरू
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील मद्यविक्री करणाऱ्यांना आँनलाईन मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांसाठी ई-टोकन सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी दुकानाबाहेर गर्दी न करता, त्यांना मिळालेल्या टोकनद्वारे मद्यखरेदी करता येऊ शकते. अशाने गर्दी ही होणार आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम ही पाळले जातील. पुण्यात प्रायोगिकतत्वार सध्या हा उपक्रम सुरू  असून लवकरच मुंबईसह इतर ठिकाणी ही सुरू होऊ शकतो.

महाराष्ट्रात राज्य सरकारने मध्यंतरी दारूविक्रीवरील बंदी उठवून मध्यविक्रीला परवानगी दिल. त्यानंतर तळीरामांनी दुकानांबाहेर राञीपासूनच गर्दी केली. ही गर्दी आटोक्यात आणताना, पोलिसांना नाकेनऊ आले. आधीच कोरोनाचे संकट असताना, अशा होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. म्हणून काही जिल्ह्यांनी मध्यविक्रीवर पून्हा निर्बंध आणले. माञ या दोन दिवसात सरकारी तिजोरीत चक्क 62 कोटींची भर पडली. सध्या कोरोनाचे संकट लक्षात घेता. महाराष्ट्राचा आर्थिक व्यवहार ठप्प झाला आहे. या व्यवहारांना पून्हा चालना देणे गरजेचे आहे. त्यासाठीच आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्यापाऱ्यांनी बनवलेल्या एका नवीन संकल्पनेद्वारे वाईन शॉप्समध्ये होणारी गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ई-टोकन ही उपायोजना प्रायोजित तत्वावर सुरू करण्याचे ठरवले आहे.

 या हायटेक उपाययोजनेमुळे मद्यप्रेमींचा रांगेत ताटकळत उभं राहण्याचा त्रास टळणार आहे मद्यप्रेमींसाठी ई-टोकन सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी या संकेत स्थळावर रजिस्ट्रेशन करुन ई-टोकन घेणे आवश्यक आहे. या संकेत स्थळावर ग्राहकाने सुरुवातीला आपला मोबाईल नंबर आणि नाव नमूद करायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा आणि पिन कोड नमूद करायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर ग्राहकास आपल्या नजीकच्या मद्यविक्री दुकानांची यादी मिळेल. त्यापैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल. तर घरपोच डिलेव्हरी करणाऱ्याच्या तोंडाला मास्क, हातात ग्लोज, आणि सँनिटायझरचा वापर सक्तीचा आहे. मुंबईत ही अशा प्रकारे आँनलाईन विक्री करता येणार आहे. माञ शासनाच्या अटी आणि शर्तींचे पालन करणाऱ्या मद्यविक्रेत्यांनाच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवनागी मिळणार आहे. आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकास ई-टोकन मिळणार आहे. त्यानंतर सदर टोकननुसार ग्राहक आपल्या सोईच्या वेळी संबधित दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात.


सदर वेबसाईट खाजगीरित्या पुणे येथील मद्य विक्रेते संघटनेने विकसित करून प्रकाशित व प्रसारित केलेली आहे. या पद्धतीने ऑनलाइन मद्य विक्री होत नसून फक्त ' इ टोकन सिस्टीम' द्वारे दुकानांसमोर गर्दी टाळली जाते. या प्रणाली मुळे निश्चितच कोरोना च्या काळात गर्दी टाळण्यासाठी उपयोग होतो.

उषा शर्मा, उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा